अपघाताने घेतला गोव्याच्या माजी क्रिकेटपटूचा जीव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

हळदोणे येथील आलोक  साखळी सरकारी महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी गोव्याच्या वयोगट संघाचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.

पणजी-  गोव्याचे माजी क्रिकेटपटू आलोक शिरोडकर यांचे मंगळवारी निधन झाले. गतआठवड्यात रस्ता अपघातात ते जबर जखमी झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू होते, त्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हळदोणे येथील आलोक  साखळी सरकारी महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी गोव्याच्या वयोगट संघाचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. गोव्याच्या १९ वर्षांखालील संघापर्यंत त्यांनी आघाडी फळीतील फलंदाजीत चुणूक दाखविली होती. राष्ट्रीय पातळीवर गोवा विद्यापीठाच्या क्रिकेट संघातून खेळले होते. राज्यपातळीवर क्लब क्रिकेटमध्ये त्यांनी चमक दाखविली. आरंभीच्या कारकिर्दीत ते फिरकी गोलंदाजही होते. प्राप्त माहितीनुसार, मृत्यूसमयी त्याचे वय २९ होते.

संबंधित बातम्या