माजी क्रिकेटपटू लक्ष्मणची सोशल मिडियावर ‘दिल छु जाने वाली’ पोस्ट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

नुकतचं लक्ष्मणने 75 वर्षीय सेल्वमा या महिलेचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय झाला आहे. यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (आयपीएल) सनराइजर्स हैदराबाद संघाचा मेंटॉर आहे. क्रिकेट क्षेत्रात समालोचन करत असताना त्याच्या सोशल मिडियावरील पोस्ट सामाजिक भान जागृत करायला लावतात.  त्याच्या पोस्टसाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मणचं क्रिकेट व्यतिरिक्त सामाजीक प्रश्नांकडेही लक्ष असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकत असतो. नुकतचं लक्ष्मणने 75 वर्षीय सेल्वमा या महिलेचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सेल्वमा सौरउर्जेचा वापर करुन मकेची कणसे भाजत असताना दिसत आहे. 

सेल्वमा यांना कोळसा पेटवण्यासाठी याआगोदर हातपंखा वापरावा लागत होता. वारंवार हाताने वारा घालून धग कायम ठेवण्यासाठी  बरीच उर्जा खर्च होत होती. अखेर त्यावर त्यांनी मार्ग काढत सौरउर्जेवर चालणारा पंखा घेण्याचा विचार केला. आणि त्या फक्त विचार करुन थांबल्या नाही तर त्यांनी ते प्रत्यक्षात कृतीतुन करुन दाखवलं. हे सगळ पाहिल्यानंतर लक्ष्मणलाही खूप आनंद झाला आणि त्याने सेल्वमा यांचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. सेल्वमा या सौरउर्जेचा वापर फक्त पंखा नाहीतर रात्रीच्या वेळी एलईडी लाईट्ससाठीही करतात. त्यामुळे लक्ष्मणला सेल्वमा यांची कल्पना चांगली आवडली आहे. त्यानंतर त्यांचा फोटो लक्ष्मणने सोशल मिडियावर शेअर केला. यापूर्वीही लक्ष्मणने अनेक क्लृप्त्या वापरणाऱ्या लोकांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Former cricketer Laxmans Dil Chhu Jaane Wali post on social media)

IPL 2021 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच दिसणार विशेष दृश्य

लक्ष्मण सनराजर्स हैदराबाद संघाबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून जोडला गेला आहे. 2016 मध्ये हैदराबादने आयपीएलचा किताब जिंकला होता. त्यानंतर मात्र त्याच्या संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा नव्या जोशात हैदराबाद संघ उतरला आहे. 11 एप्रिलला कोलकाता नाइट रायडर्ससोबत या पर्वातील हैदराबादचा सामना रंगणार आहे.

 

संबंधित बातम्या