गोव्याचे माजी क्रिकेटपटू दीपक शिरगावकर यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

गोव्याचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे राज्यस्तरीय सक्रिय क्रिकेट पंच दीपक शिरगावकर यांचे कोरोना विषाणू संसर्गाने सोमवारी निधन झाले.

पणजी: गोव्याचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे राज्यस्तरीय सक्रिय क्रिकेट पंच दीपक शिरगावकर ((Deepak Shirgaonkar) यांचे कोरोना विषाणू संसर्गाने सोमवारी निधन झाले.

दीपक यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धांत गोव्याचे 19 वर्षांखालील वयोगटापासून 25 वर्षांखालील वयोगटापर्यंत प्रतिनिधित्व केले होते. राज्यपातळीवरील स्पर्धांत ते डिचोली, तसेच शिरगाव या संघांतर्फे खेळले होते. दीपक यष्टिरक्षक आणि उपयुक्त फलंदाजही होते. 

IPL 2021: ''हे '' 5 विक्रम यंदाच्या आयपीएल हंगामात मोडू

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दीपक राज्यस्तरीय पंच बनले. राज्यातील विविध क्रिकेट स्पर्धांत त्यांनी पंचगिरी केली आहे. दीपक यांच्या निधनाबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सदाहसमुख दीपक यांच्या निधनाने अपरिमित हानी झाली असून खूप धक्का बसल्याचे संघटनेने शोकसंदेशात म्हटले आहे. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते.

संबंधित बातम्या