गोव्याच्या माजी क्रिकेटपटूची अमेरिकेत नवी `इनिंग`

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

भारताच्या या माजी 19 वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या यष्टिरक्षक-फलंदाजाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) (BCCI) कक्षेतील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

पणजी: गोव्याचा माजी पाहुणा रणजी क्रिकेटपटू स्मित पटेल (Smit Patel) याने अमेरिकेत(United States) कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्याचे ठरविले आहे. भारताच्या या माजी 19 वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या यष्टिरक्षक-फलंदाजाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) (BCCI) कक्षेतील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

मूळ गुजरातचा हा 28 वर्षीय क्रिकेटपटू गुजरातव्यतिरिक्त त्रिपुरा, गोवा (Goa) आणि बडोद्यातर्फे प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळला. कोरोना विषाणू महामारीमुळे मर्यादित स्वरूपात झालेल्या 2020-21 मधील देशांतर्गत मोसमात त्याने एकदिवसीय आणि टी-20 स्पर्धेत बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. (Former Goa cricketers new innings in US)

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेचा ग्रीन कार्ड धारक (Green card) असल्याने स्मित तेथे खेळू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण केल्यानंतर तो अमेरिकेतर्फे खेळू शकेल. सध्या तो अमेरिकेतील अॅरिझोना येथे आहे. येत्या 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धेसाठी त्याला बार्बाडोस ट्रायडेन्टस (Barbados Tridentus) संघाने करारबद्ध केले आहे.

गोवा: शिखाला कसोटी क्रिकेटचे वेध

पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने त्रिपुराचे तीन मोसम प्रतिनिधित्व केल्यानंतर 2019-20 मोसमात स्मित गोव्यातर्फे 10 रणजी क्रिकेट (Ranji Cricket) सामन्यांत खेळला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्मित 55 सामने खेळला असून 39.49च्या सरासरीने 

3278 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके व 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 43 एकदिवसीय (लिस्ट ए) सामन्यांत त्याने 1234 धावा, तर 28 टी-20 सामन्यांत 708 धावा केल्या आहेत. 

IPL 2021: बीसीसीआयचा मोठा निर्णय; UAE मध्ये होणार 31 सामने

गोव्याकडून वैयक्तिक सर्वोच्च

स्मित 20 ते 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीत गोव्याकडून वलसाड येथे गुजरातविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत खेळला. हा त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च 236 धावसंख्या त्याने गोव्यातर्फे खेळताना मिझोरामविरुद्ध कोलकाता येथे नोंदविली.

गोव्यातर्फे स्मित पटेलची रणजी कारकीर्द

- 10 सामने, 14 डाव, 2 नाबाद

- 66.58च्या सरासरीने 799 धावा

- 3 शतके, 3 अर्धशतके, 20 झेल, 2 यष्टिचीत

- शतके ः मणिपूरविरुद्ध नाबाद 100, अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 137, मिझोरामविरुद्ध 236
 

संबंधित बातम्या