IPL 2022: माजी प्रशिक्षकाने निवडली 'ऑल टाईम फेमस टीम', सचिन करणार सलामी

भारताचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक या पदावरही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालचंद राजपूत यांनी त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भारतीय आयपीएल (IPL) संघ निवडला आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

भारताचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक या पदावरही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालचंद राजपूत यांनी त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भारतीय आयपीएल संघ निवडला आहे. लालचंद राजपूत यांनी आपल्या करिअरमध्ये टी-20 क्रिकेट खेळले नसले तरी, लालचंद हे 2007 साली दक्षिण आफ्रिकेत (South Africa) टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. तसेच, ते पहिल्या आवृत्तीत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कोचिंग सेटअपशी संबंधित होते.

दरम्यान, राजपूत यांनी माध्यमाशी बोलताना आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय आयपीएल संघ निवडला. आणि या संघात राजपूत यांनी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) डावाची सलामी देण्यासाठी निवडले हे थोडं आश्चर्यकारक आहे. सचिन आयपीएलमधील बरेच सामने खेळलेला नाही हे सर्वश्रुत आहे. त्याचवेळी राजपूत यांनी मुंबई इंडियन्ससाठी पाच विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माचीही संघात निवड केली आहे. मात्र, सध्याचा चालू हंगाम रोहितसाठी खूपच निराशाजनक गेला आहे.

Sachin Tendulkar
IPL 2022: ''किंग कोहलीने धावा काढण्याचा नवा फॉर्म्युला शोधावा''

एवढंच नाही तर, राजपूत यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर फिनिशिंगची जबाबदारी सोपवली आहे, त्यानंतर रवींद्र जडेजालाही (Ravindra Jadeja) इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. लालचंद राजपूत यांनी निवडलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय आयपीएल संघ खालीलप्रमाणे आहे:

1. सचिन तेंडुलकर 2. रोहित शर्मा 3. केएल राहुल 4. विराट कोहली 5. सुरेश रैना 6. युवराज सिंग 7. एमएस धोनी 8. रवींद्र जडेजा 9. झहीर खान 10. जसप्रीत बुमराह 11. मोहम्मद शमी

Sachin Tendulkar
IPL 2022 : गुजरातनंतर आणखी 3 संघ मुंबईच्या निशाण्यावर

दुसरीकडे, लालचंद राजपूत यांनी अतिशय संतुलित संघ निवडला यात शंका नाही, परंतु सचिनच्या निवृत्तीनंतर टी-20 क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. इथे इतर अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी अनेक विक्रम केले आहेत. अशा परिस्थितीत काही चाहते संघातील खेळाडूंच्या स्थानावर नक्कीच सवाल उपस्थित करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com