शास्त्री मास्तरांचा मोठा दावा, 2023 च्या WC नंतर ODI फॉरमॅटला हार्दिक करणार अलविदा

Former India Coach Ravi Shastri: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा दावा केला आहे.
Former India Coach Ravi Shastri & Hardik Pandya
Former India Coach Ravi Shastri & Hardik Pandya Dainik Gomantak

Former India Coach Ravi Shastri & Hardik Pandya: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री म्हणाले की, 'हार्दिक पांड्या 2023 च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करु शकतो.' बेन स्टोक्सने 50 षटकांच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिडा वेळापत्रक जाहीर झाले. क्रिकेटपटू नियमितपणे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असतात. यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो.

दरम्यान, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही वनडे फॉरमॅटबाबत मत व्यक्त केले आहे. हार्दिकला T20 फॉरमॅटमध्ये खेळायचे असून तो याबद्दल खूप स्पष्ट आहे.

Former India Coach Ravi Shastri & Hardik Pandya
माझ्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड सर्वोत्तम व्यक्ती :रवी शास्त्री

शास्त्री पुढे म्हणाले, " जेव्हा तुम्ही फक्त विश्वचषकावर लक्ष केंद्रित करता तेव्हा 50 षटकांचा फॉरमॅट काळाच्या पडद्याआड जाऊ शकतो. मात्र आयसीसीच्या (ICC) दृष्टिकोनातून विश्वचषकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग तो टी-20 विश्वचषक असो किंवा 50 षटकांचा विश्वचषक असो. कसोटी क्रिकेट नेहमीच कायम असेल, कारण ते महत्त्वाचे आहे. अनेक खेळाडू त्यांना कोणता फॉरमॅट खेळायचा आहे ते आधीच निवडत आहेत. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) घ्या. हार्दिकला केवळ T20 फॉरमॅट खेळायचा आहे.''

Former India Coach Ravi Shastri & Hardik Pandya
जडेजा नाही तर हा खेळाडू व्हायला हवा होता CSKचा कर्णधार; रवी शास्त्री

ते पुढे म्हणाले, "तो 50 षटकांचा फॉरमॅट खेळेल कारण पुढच्या वर्षी भारतात विश्वचषक आहे. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करु शकतो. तुम्हाला इतर खेळाडूंसोबतही असेच घडताना दिसेल, ते फॉरमॅट निवडण्यास सुरुवात करतील. आणि तो त्यांना अधिकार आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com