भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन

1983 च्या विश्वचषकातही(Cricket) त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.
 भारताचे माजी क्रिकेटपटू  यशपाल शर्मा यांचं निधन
Former Indian cricketer Yashpal Sharma diesDainik Gomantak

माजी भारतीय क्रिकेटपटू(Cricketer), 1983 च्या विश्वविजेत्या(World Cup) संघाचे सदस्य, आणि भारतीय निवडसमितीचे माजी सदस्य यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, ते 66 वर्षांचे होते. (Cricket)

सकाळी मॉर्निंग वॉकवरून घरी परत आल्यावर त्यांना थोडेसे अस्वस्थ वाटून त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा सकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Former Indian cricketer Yashpal Sharma dies
क्रिकेटच्या 'युनिवर्सल बॉस'ची T-20 मध्ये ऐतिहासिक कामगिरी

यशपाल शर्मा हे एक उत्तम खेळाडू होते. 1983 च्या विश्वचषकात त्यांचा भारतीय संघात समावेश होता. इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यांचे अर्धशतक आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्यांनी भारतीय संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत उकृष्ट कामगिरी केली आहे. शर्मा यांनी टीम इंडियाकडून 37 कसोटी सामन्यात 1606 धावा केल्या आहेत. यात, 2 शतके आणि 9 अर्धशतके त्यांच्या नावावर आहेत. कसोटी सामन्यात सर्वाधिक 140 धावा त्यांच्या नावावर आहेत.

याशिवाय, शर्मा यांनी भारताकडून 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत एकूण 883 धावा त्यांनी केल्या असून, त्यात 4 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 89 धावा यशपाल शर्मा यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत यांच्या नावावर एकदाही शून्यावर बाद न होण्याचा विक्रमाची देखील नोंद आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com