'विराट कोहलीला वगळू शकेल असा कोणताही सिलेक्टर भारतात जन्माला आला नाही'

खराब फॉर्ममुळे विराट कोहलीवर सातत्याने टीका होत आहे. आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने विराट कोहलीला संघातून वगळण्याच्या प्रश्नावर मोठे वक्तव्य केले आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak

Rashid Latif On Virat Kohli: भारताचा महान फलंदाज विराट कोहली खराब फॉर्ममुळे सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. अनेक माजी खेळाडू विराट कोहलीला संघातून वगळण्याची चर्चा करत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, विराट कोहलीला वगळू शकेल असा कोणताही निवडकर्ता भारतात जन्माला आला नाही.

(former Pakistan captain has made a big statement on the issue of dropping Virat Kohli from team)

Virat Kohli
PAK vs SL: आणीबाणीतही श्रीलंकेत पाकिस्तान टिमचे जल्लोषात स्वागत, पहा व्हिडिओ

रशीद लतीफने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल खूप आवाज उठवला जात आहे, परंतु या अनुभवी खेळाडूने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याने इंग्लंड दौऱ्यानंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती मागितली होती. आता भारतीय निवड समितीने विराट कोहलीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे, असेही तो म्हणाला.

विराट कोहलीची बॅट शांत

विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याचबरोबर या इंग्लंड दौऱ्यावरही विराट कोहलीचा फ्लॉप शो कायम आहे. एजबॅस्टन कसोटीशिवाय विराट कोहली टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही धावा काढण्यासाठी धडपडत आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर पुनरागमन करताना तो किती काळ आपल्या जुन्या शैलीत परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com