IPL vs PSL: IPL अन् PSL मध्ये कोणती लीग श्रेष्ठ? पाकिस्तानी क्रिकेटपटूने दिले खास उत्तर

इंडियन प्रीमियर लीग 2022 सीझन (IPL 2022) सुरु झाला आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध लीग त्याच्या 15 व्या हंगामात पोहोचली आहे.
IPL
IPLDainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग 2022 सीझन (IPL 2022) सुरु झाला आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध लीग त्याच्या 15 व्या हंगामात पोहोचली आहे. आयपीएलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या लीगमधून अनेक नवख्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ज्यांनी पुढे भारतीय संघातही आपले स्थान पक्के केले. एवढंच नाही तर इतर देशांमध्येही टी-20 लीग सुरु झाल्या आहेत, ज्यापैकी एक पाकिस्तान सुपर लीग (PSL) आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये होणाऱ्या या लीगनेही खूप नाव कमावले आहे. अशा परिस्थितीत कधी कधी आयपीएल आणि पीएसएलची तुलना सुरु होते कोणती लीग श्रेष्ठ आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे वेगवेगळे दावे अनेकदा ऐकायला मिळाले आहेत. परंतु पाकिस्तानच्या (Pakistan) एका माजी क्रिकेटपटूने स्पष्टपणे सांगितले की, 'आयपीएलच्या तुलनेत पीएसएल ( IPL vs PSL comparison) अजूनही मागे आहे. आणि मागे असण्याचंही एक खास कारण आहे.' (Former Pakistan leg spinner Danish Kaneria said Pakistan Super League is still lagging behind the IPL)

दरम्यान, पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया (Danish Kaneria) म्हणाला, 'पाकिस्तान सुपर लीग आयपीएलच्या तुलनेत अजूनही मागेच आहे. गेल्या 15 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेली इंडियन प्रीमियर लीग खूप पुढे आहे.' याचे मुख्य कारण सांगताना कनेरिया म्हणाला की, ''आयपीएलने गेल्या काही वर्षांत क्रिकेट जगताला अनेक नवे आणि चांगले तरुण खेळाडू दिले आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीच्या माध्यमातून आप छाप पाडली आहे. त्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगला फारसे यश मिळवता आले नाही.''

IPL
IPL 2022: विराट कोहलीने जसप्रीत बुमराहकडे केले होते दुर्लक्ष, माजी RCB खेळाडूने सांगितला किस्सा

आयपीएलमधून अनेक प्रतिभावंतांना संधी मिळाली

दानिश कनेरिया हा अनेकदा पाकिस्तानी क्रिकेटबद्दल उघडपणे बोलण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तान टीम आणि टीम इंडियामध्ये (Team India) नेमका काय फरक आहे, याबद्दल तो अनेकदा बोलत असतो. आता आयपीएलची खासियत आणि पीएसएलमधील फरकांबद्दल बोलताना, दानिशने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "व्यावसायिक स्पर्धा असल्याने, आयपीएल भारतीय क्रिकेटला भरपूर प्रतिभा देत आहे. आणि विशेष म्हणजे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात अनेक नवख्या खेळाडूंना संधी दिली जाते. तर दुसरीकडे मात्र पीएसएल पाकिस्तानी क्रिकेटसाठी काहीच करत नाही. जर एखाद्या खेळाडूने पीएसएलमध्ये शानदार कामगिरी केली तर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अव्यावसायिक वृत्तीमुळे त्या खेळाडूची राष्ट्रीय संघात येण्याची शक्यता कमी होते."

IPL
IPL 2022: मास्टर ब्लास्टरच्या 'या' टिप्स मुरुगन अश्विनसाठी ठरल्या वरदान

आयपीएल ही एक मोठी स्पर्धा

इतकंच नाही तर कनेरियाने आयपीएलचा प्रभाव आणि महत्त्वाचं आणखी एक उदाहरण देताना म्हटलयं की, ''आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते. दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी आयपीएल खेळण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय संघातून रजा घेतली असल्याचे वृत्त तुम्ही वाचले असेल.''

IPL
IPL 2022: इंजिनिअरिंग नंतर बनला क्रिकेटर, आता KKR कडून मैदानात!

आयपीएलची (IPL) सुरुवात 2008 मध्ये झाली, जी जगातील पहिली प्रमुख T20 लीग म्हणून ओळखली गेली. आयपीएलचा आदर्श घेत 2010 मध्ये ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग सुरु झाली. त्याचवेळी, पाकिस्तान सुपर लीग 2016 मध्ये सुरु झाली. याशिवाय कॅरेबियन प्रीमियर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग आणि लंका प्रीमियर लीग यांसारख्या स्पर्धाही खेळल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com