दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
Former South African captain Faf Duplessis has retired from Test cricket

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयाची माहिती त्याने आज  सोशल मीडियावरून दिली. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘या  निर्णयासाठी मी पूर्णपणे तयार आहे. आयुष्यात नवीन पर्व सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे’, अशा आशयाची पोस्ट लिहित आपला हा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेकडून डुप्लिसीने 69  कसोटीत 40 च्या सरासरीने 4163 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 10 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत.

त्याने लिहिले, "प्रतिकूल परिस्थितीत लढा देण्याचे हे एक वर्ष राहिले आहे. त्यावेळीसुद्धा अनिश्चितता होती, परंतु यामुळे बर्‍याच बाबींविषयी माझे मत स्पष्ट झाले. आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी माझी मानसिकता तयार झाली आहे.खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सन्मान आहे, पण आता माझी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. पुढील दोन वर्षात आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. यामुळे मी माझे सगळे लक्ष यत्यावर केंद्रित करीत आहे." त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचे कसोटी आणि टी -20 कर्णधारपद सोडले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Faf du plessis (@fafdup)

नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध त्याने दोन कसोटी मालिका खेळल्या होत्या. पण फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या कसोटीत त्याने 33 आणि दुसर्‍या कसोटीत 22 धावा केल्या. दोन्ही कसोटी सामन्यात यजमानांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तेव्हापासून त्याच्या कोसटी क्रिकेटमधील खेळावर प्रश्न उपस्थित होत होते. तथापि, दोन महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार फलंदाजी केली. सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 199 धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्यादेखील होती. दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना एक डाव आणि 45 धावांनी जिंकला.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com