प्रसिद्ध अम्पायर Rudi Koertzen यांचा कार अपघातात मृत्यू

Umpire Rudi Koertzen: दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय अम्पायर रुडी कर्टझेन यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाले.
Umpire Rudi Koertzen
Umpire Rudi Koertzen Dainik Gomantak

Umpire Rudi Koertzen Death: दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) माजी आंतरराष्ट्रीय अम्पायर रुडी कर्टझेन यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाले. कर्टझेन 73 वर्षांचे होते. एका स्थानिक वेबसाईटच्या वृत्तानुसार, कर्टझेन यांच्या कारचा अपघात रिव्हर्सडेलजवळ झाला. कर्टझेन यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि चार मुले आहेत. कर्टझेन हे जगातील सर्वात विश्वासू अम्पायर मानले जातात. 1990 ते 2010 दरम्यान, कर्टझेन सुमारे 400 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होते.

दरम्यान, कर्टझेन त्यांच्या 'स्लो फिंगर ऑफ डेथ' साठी प्रसिद्ध होते. खरे तर ते फलंदाजाला बाद करण्याचा निर्णय देताना हात खूप हळू उचलायचे. या कारणास्तव त्यांना 'स्लो फिंगर ऑफ डेथ' म्हटले जाऊ लागले. रुडी यांच्या मुलाने वडिलांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Umpire Rudi Koertzen
किरॉन पोलार्ड 1xBet चा नवा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर

दुसरीकडे, कर्टझेन यांच्या मुलाने सांगितले की, 'ते त्यांच्या मित्रांसोबत गोल्फ खेळायला गेले होते. सोमवारी ते परतणार होते. परंतु मित्रांसमवेत ते तिथेच थांबले.' कर्टझेन यांनी 128 कसोटी, 250 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फील्ड अम्पायर किंवा टीव्ही अम्पायर म्हणून भूमिका बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com