Hockey Tournament: विजेतेपदासाठी झारखंडला उत्तर प्रदेशचे आव्हान

गतविजेत्या झारखंडला (Jharkhand) राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेतील विजेतेपद राखण्यासाठी उत्तर प्रदेशचे आव्हान मागे सारावे लागेल.
Jharkhand
JharkhandDainik Gomantak

पणजी: गतविजेत्या झारखंडला राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेतील विजेतेपद राखण्यासाठी उत्तर प्रदेशचे आव्हान मागे सारावे लागेल.अंतिम सामना रविवारी (ता. १५) पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर होईल.

उपांत्य फेरीतील सामने शनिवारी झाले. गतविजेत्यांना ओडिशाने चांगलेच झुंजविले. निर्धारित वेळेतील 1-1 गोलबरोबरीनंतर झारखंडने (Jharkhand) शूटआऊटद्वारे 3-1 असा विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली. दुसरा उपांत्य सामना एकतर्फी ठरला. उत्तर प्रदेशने हरियानास 8-0 असे सहजपणे हरविले.

Jharkhand
Hockey Tournament: गतविजेत्या झारखंडची विजयी सलामी

झारखंडने पिछाडीवरून बरोबरी साधली. संजित तिर्की याने 38 व्या मिनिटास ओडिशाला (Odisha) आघाडी मिळवून दिल्यानंतर 39 व्या मिनिटास अभिषेक टिग्गा याच्या गोलमुळे झारखंडला बरोबरी साधता आली. नंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. शूटआऊटमध्ये झारखंडच्या रोहित तिर्की, असिम एक्का व अभिषेक टिग्गा यांनी अचूक नेम साधला. ओडिशातर्फे फक्त अरबिन टोप्पो याला चेंडूला योग्य दिशा दाखविला आली.

Jharkhand
Asian Hockey Championship: भारताने पाकिस्तानला दिली मात

कर्णधार मनोज यादव उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने चार गुण नोंदविताना अनुक्रमे 13, 14, 34 व 36 व्या मिनिटास अचूक नेमबाजी केली. अजित यादव व महंमद झैद खान यांनी अनुक्रमे दोन गोल नोंदवत उत्तर प्रदेशच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अजितने 26 व 49 व्या मिनिटास, झैदने 37 व 55 व्या मिनिटास गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com