युवा फुटबॉलपटूंच्या घरी ‘फोर्सा गोवा’

किशोर पेटकर
गुरुवार, 30 जुलै 2020

६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींनी या कार्यक्रमात भाग घेता येईल. नोंदणी करण्यासाठी पालकांना ८०८०४५७७२८ व्हॉट्सॲप संदेश पाठवावा लागेल.

 

पणजी : कोविड-१९ महामारीमुळे फुटबॉल मैदानावर खेळणेतसेच सराव शक्य नाही. ही उणीव दूर करताना आता फोर्सा गोवा फौंडेशनने युवा फुटबॉलपटूंच्या घरी जाण्याचा अभिमव उपक्रम अंमलात आणण्याचे ठरविले आहे.

फोर्सा गोवा फौंडेशनच्या या अभिनव उपक्रमांतर्गत घरीच प्रशिक्षक कार्यक्रम सुरू होईल. ऑनलाईन (व्हॉट्सॲप) माध्यमाचा आधार घेत मुलांना फुटबॉल कौशल्य विकसित करण्यास शिकविले जाईलत्यांना परवानाप्राप्त प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल. या उपक्रमासाठी फोर्सा गोवा फौंडेशनने सर्वेक्षण केले आहे. कार्यरत जीवनशैली राखण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षण पुरविणे हा उपक्रमाचे मुख्य हेतू आहे.

या तीन महिन्यांच्या उपक्रमात युवा फुटबॉलपटूंचे खेळातील कौशल्य विकसित करताना त्यांना आहारकचरा व्यवस्थापन आदींची माहितीही पुरविली जाईल. त्यात मान्यवर मार्गदर्शन करतील. ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींनी या कार्यक्रमात भाग घेता येईल. नोंदणी करण्यासाठी पालकांना ८०८०४५७७२८ व्हॉट्सॲप संदेश पाठवावा लागेल.

 संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या