France vs Poland: पोलंडचा धुव्वा उडवत फ्रान्स क्वार्टर फायनलमध्ये; 3-1 गोलफरकाने मात

किलियन एम्बापे याचे धडाकेबाज दोन गोल, ओलिवर जिरूडने नोंदवला एक गोल
France vs Poland:
France vs Poland:Dainik Gomantak

France vs Poland: कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी पहिल्या सामन्यात फ्रान्सने पोलंडचा 3-1 असा एकतर्फी धुव्वा उडवला. या विजयाने फ्रान्स क्वार्टर फायनलमध्ये पोहचला आहे तर पोलंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्रान्सच्या किलियन एम्बापे यांने दोन गोल नोंदवले तर ओलिवर जिरूड याने एक गोल नोंदवला.

पोलंडच्या रॉबर्ट लोवांडोवस्की याने भरपाई वेळेत (90+9 मिनिटाला) पेनल्टीवर गोल केला. त्यामुळे फ्रान्सची आघाडी एका गोलने कमी झाली.

(FIFA World Cup 2022)

France vs Poland:
Lionel Messi vs Cristiano Ronaldo: लिओनेल मेस्सीने 1000 व्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे

फ्रान्सकडून पहिला गोल ओलिवर जिरूड याने 44 व्या मिनिटाला केला. किलियन एम्बापेच्या पासवर ओलिवरने हा गोल नोंदवला. या गोलसोबतच जिरूड याने फ्रान्ससाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. जिरूड याने थिएरी हेन्री यांचा 51 गोलना त्याने मागे टाकले आहे. पुर्वार्धाचा खेळ संपेपर्यंत फ्रान्स 1-0 ने आघाडीवर होता.

त्यानंतर फ्रान्सचा आघाडीचा स्ट्रायकर किलियन एम्बापे यानेच पुन्हा फ्रान्सची आघाडी वाढवली. एम्बापे याने 74 आणि भरपाई वेळेत 90+1 व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सची आघाडी भक्कम केली. या वेळेपर्यंत फ्रान्सने 3-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पोलंडच्या रॉबर्ट लोवांडोवस्की याने भरपाई वेळेत (90+9 मिनिटाला) मिळालेल्या पेनल्टीवर कोणतीही चुक न करता चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. फ्रान्सने हा सामना 3-1 अशा गोलफरकाने जिंकला.

France vs Poland:
Rohit Sharma New Record: हिटमॅन रोहित शर्माने मोहम्मद अझरुद्दीनला टाकले मागे

फ्रान्सने नवव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पोलंडचा संघ मात्र 1982 नंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेला नाही. आजच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड होते. आता क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सचा सामना आजच होणाऱ्या इंग्लंड विरूद्ध सेनेगल या सामन्यातील विजेत्याशी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com