वेदांत महिला लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी वायएफए, शिरवडे संघाला पूर्ण गुण

स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना शिरवडे स्पोर्टस क्लबने युनायटेड क्लब तळावलीस 2-0 फरकाने नमविले. हा सामना नावेली येथील मैदानावर झाला.
Goa Football Association
Goa Football AssociationDainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) वेदांत महिला लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी एफसी वायएफए व गतविजेत्या शिरवडे स्पोर्टस क्लबने पूर्ण तीन गुणांची कमाई केली. धर्मापूर मैदानावर वायएफए संघाने कॉम्पॅशन एफसीवर 1-0 फरकाने मात केली. स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना शिरवडे स्पोर्टस क्लबने युनायटेड क्लब तळावलीस 2-0 फरकाने नमविले. हा सामना नावेली येथील मैदानावर झाला.

सामन्याच्या 25 व्या मिनिटास ज्योलिंडा फेर्राव हिने नोंदविलेल्या गोलमुळे वायएफए संघाने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. मागील लढतीत त्यांना तळावली संघाने हरविले होते. वायएफए संघाचे आता दोन लढतीनंतर तीन गुण झाले असून कॉम्पॅशन संघाला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Goa Football Association
जॉय काकोडकरने बुद्धिबळात विजेतेपद पटकावले

गतविजेत्या शिरवडे क्लबने सामन्याच्या शेवटचा चार मिनिटांत दोन गोल नोंदवून तळावली संघाचे कडवे आव्हान परतावून लावले. कर्णधार नेव्हिला कुलासो हिने 86 व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडल्यानंतर, 90 व्या मिनिटास व्हिनोष्का फर्नांडिसने शिरवडे क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचे दोन लढतीतून सहा गुण झाले आहेत. तळावली क्लबचा दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे सहा गुण कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com