आयपीएल 2021 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 9 एप्रिलपासून सुरू होणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून चेन्नई येथे होईल आणि त्याचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून चेन्नई येथे होईल आणि त्याचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल 2021 चा पहिला सामना पाच वेळा चॅम्पियन ठरलेले मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. हा सामना 9 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता चेन्नई येथे खेळवला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलम्ध्ये पोहोचल्यावर के एल राहुलने केलं विराट कोहलीचं कौतुक

आयपीएलचे सर्व सामने सहा मैदानांवर होतील

यावर्षी आयपीएल 2021 चे सर्व सामने फक्त चार मैदानांवर होणार आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे की आयपीएल 2021 चे सर्व सामने यावर्षी अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई व कोलकाता येथे खेळले जातील. आयपीएल 2021 च्या एकूण 56 सामन्यांपैकी चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळुरू येथे प्रत्येकी  सामने तर अहमदाबाद आणि दिल्लीत 8 सामने खेळले जातील. यावेळच्या आयपीएलचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील. कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर कोणताही सामना खेळणार नाही. आयपीएल सामने काही निवडक ठिकाणी आयोजित केले आहेत, यामुळे पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादला आक्षेप असू शकतो कारण हैदराबाद, जयपूर, मोहालीत कोणताही सामना आयोजित करण्यात आलेला नाही. 

दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने प्रस्ताव दिला आहे की आयपीएल 2021 मध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊ दिले जाऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता प्रभाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद या पाच शहरांमध्ये आयपीएल सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील कोरोना प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याने सामन्यांचे आयोजन करण्यासाठी मुंबईत सामन्यांचे आयोजन कऱण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. येत्या काही आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चेन्नई आणि कोलकाता येथे सामन्यांचे समान वाटप केले जाईल. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत प्रेक्षकांशिवाय आयपीएल सामने खेळवण्याच्या प्रस्तावास  मान्यता मिळू शकते. 

ISL 2020-21: 'सुपर सब` सिला नॉर्थईस्टच्या मदतीस; इंज्युरी टाईम गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरीत रोखले

हे 8 संघ भिडणार

1.    मुंबई इंडियन्स
2.    चेन्नई सुपरकिंग्ज
3.    राजस्थान रॉयल्स 
4.    सनरायजर्स हैदराबाद
5.    पंजाब किंग्ज
6.    कोलकाता नाईटरायडर्स
7.    दिल्ली कॅपिटल्स
8.    रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर

संबंधित बातम्या