GAF चा पहिला सामना एकऑक्टोबर रोजी

पहिला सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर संध्याकाळी चार वाजता खेळला जाईल.
GAF declare next football matches schedule
GAF declare next football matches scheduleDainik Gomantak

गोवा फुटबॉल असोसिएशनचा (GAF) 2021-2022 मोसमाला येत्या एक ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आरंभीच्या मदतनिधी सामना फुटबॉलप्रेमींच्या (Goa Football) उपस्थितीत खेळविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

जीएफएने शनिवारी जाहीर केल्यानुसार, मोसमाची सुरवात करणारा मदतनिधी सामना एक ऑक्टोबरला प्रोफेशनल लीग स्पर्धेतील गतविजेते स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि उपविजेते धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात खेळला जाईल. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर संध्याकाळी चार वाजता खेळला जाईल.

GAF declare next football matches schedule
COVID-19: राज्यात कलम 144 नव्हे तर विशेष ‘एसओपी’, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

या सामन्याद्वारे मिळणारे उत्पन्न खेळाडू कल्याण निधीत जमा होणार आहे. त्यामुळे जीएफए संलग्न क्लब, खेळाडू, चाहते, फुटबॉलप्रेमी यांनी सामन्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जीएफए अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी केले आहे.

धुळेर स्टेडियमवर सामन्यासाठी फुटबॉलप्रेमींना प्रवेश देताना कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. सामन्यासाठी मर्यादित तिकिटे उपलब्ध असतील, असेही जीएफएने स्पष्ट केले आहे. कोविड-19 मुळे जीएफएला 2020-2021 मोसम आटोपशीर पद्धतीने घ्यावा लागला होता. फक्त गोवा प्रोफेशनल लीग व महिला फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन झाले होते. दोन्ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर बंद दरवाज्याआड झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com