गोव्याचा धडाकेबाज क्रिकेटपटू स्वप्नीलचा गणपतीबाप्पा...!

स्वप्नील अस्नोडकर कुटुंबीयांचा पर्वरी येथील मूळ निवासस्थानी संयुक्त गणपती असतो, दरवर्षी सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो
गोव्याचा धडाकेबाज क्रिकेटपटू स्वप्नीलचा गणपतीबाप्पा...!
स्वप्नीलचा गणपतीबाप्पा...!Dainik Gomantak

गोव्याचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू (Cricketers), कर्णधार, आता प्रशिक्षक (Instructor) या नात्याने नवी इनिंग सुरू केलेल्या स्वप्नील अस्नोडकरची गणपती बाप्पावर गाढ श्रद्धा आहे. श्री गणेशाची आपल्यावर खूप कृपा आहे आणि त्यामुळेच आपण क्रिकेटमध्ये यश प्राप्त करू शकलो असे तो मानतो. अस्नोडकर कुटुंबीयांचा पर्वरी येथील मूळ निवासस्थानी संयुक्त गणपती असतो, दरवर्षी सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो, मात्र यंदा स्वप्नीलच्या काकाच्या निधनामुळे उत्साहावर मर्यादा आल्या, पण भक्तिभाव कायम राहिला.

``माझ्यासाठी गणपतीबाप्पा श्रद्धास्थान आहे. लहानपणापासून मला श्री गणेशाचे आकर्षण, त्यांच्या आशीर्वादामुळेच एवढी मजल गाठता आली. गणेश उत्सवाच्या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी करण्याची माझी हौस बालपणापासूची, वाढत्या वयाबरोबरच त्यास मुरड घालावी लागते, पण उत्साह कायम आहे,`` असे स्वप्नील म्हणाला.

स्वप्नीलचा गणपतीबाप्पा...!
बाप्पांसाठी Chocolate Modak कसे बनवायचे

स्वप्नील तंदुरुस्तीला भारी महत्त्व देतो, सणासुदीच्या दिवसांत स्वादिष्ट, गोड पदार्थांची रेलचेल असते. स्वप्नीललाही चतुर्थीचे गोड पदार्थ आवडतात, पण नियंत्रण राखण्यात त्याने यश मिळविले आहे. ``चतुर्थीच्या कालावधीत मिष्टान्न खाणे आलेच, पण नंतर जिममध्ये जात मेहनत घेऊन गोड पदार्थांचा शरीरावर आणि तंदुरुस्तीवर परिणाम होणार नाही याची मी दक्षता घेतो,`` असे स्वप्नील युवाजनांना संदेश देताना म्हणाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com