गौतम गंभीरकडून विराटच्या कॅप्टनसीवर पुन्हा टिका

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

स्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन एकदिवसीय सामन्यांत पराभव झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर माजी खेळाडू गौतम गंभीरने पुन्हा टीका केली आहे.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन एकदिवसीय सामन्यांत पराभव झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर माजी खेळाडू गौतम गंभीरने पुन्हा टीका केली आहे. विराट तांत्रिक चुका करत आहे. कोणताही कर्णधार आपला प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराला केवळ दोन षटकांचा सलामीला स्पेल कसा देऊ शकतो, असा रोखठोक सवाल गंभीरने उपस्थित केला.

मुळात आयपीएल संपत आल्यापासून गंभीर विराटच्या नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित करत आहे. पाच आयपीएलचे अजिंक्‍यपद मिळवणाऱ्या रोहितकडे किमान ट्‌वेन्टी-२०चे विजेतेपद द्यावे, अशी मागणी गंभीर करत आहे. आता तर ऑस्ट्रेलियात झालेल्या सलग दोन दारुण पराभवानंतर विराट कशा तांत्रिक चुका करत आहे, हे निदर्शनात आणले आहे. 

विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया कर्णधार ॲरॉन फिन्च या दोघांमधला फरक स्पष्ट केला, वेगवान गोलंदाज जॉश हॅझलवूडचा वापर फिन्च अतिशय अचूकपणे करत आहे, पण कोहली बुमरावर विश्‍वास टाकताना दिसत नाही. बुमरासारखा विख्यात गोलंदाज तुमच्याकडे आहे आणि त्याला आक्रमणाची सुरुवात करताना केवळ दोनच षटके देता? यावरून कर्णधाराची मानसिकता डळमळीत झाल्याचे दिसून येते, असे गंभीर मत गौतमने व्यक्त केले. पाच-पाच षटकांचे स्पेन बुमरा आणि शमीला द्यायला हवे होते, असेही गंभीरने सांगितले. 

 

 

संबंधित बातम्या