GCA: गोवा क्रिकेटपटूंना लस मिळणार

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

Goa Cricket Association गोवा(Goa) क्रिकेट असोसिएशनने (GCA) 18 वर्षांवरील नोंदणीकृत क्रिकेटपटूंच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचे लक्ष्य बाळगले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच मोहीम हाती घेण्याचा संघटनेचा नियोजन आहे.

पणजी: Goa Cricket Association गोवा(Goa) क्रिकेट असोसिएशनने (GCA) 18 वर्षांवरील नोंदणीकृत क्रिकेटपटूंच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचे लक्ष्य बाळगले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच मोहीम हाती घेण्याचा संघटनेचा नियोजन आहे. क्रिकेटपटूंच्या(Cricket) लसीकरणाबाबत(Vaccination) जीसीए गांभीर्याने विचार करत असल्याचे गुरुवारी सचिव विपुल फडके यांनी सांगितले. बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) मागील रविवारी पश्चिम बंगालमधील क्रिकेटपटूसाठी खासगी इस्पितळाच्या साह्याने लसीकरण मोहीम सुरू केली. त्यात 18 ते 45 वर्षे वयोगटातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ मिळून 120 जणांचा समावेश होता.(Goa cricketers will get vaccinated)

बंगाल क्रिकेट संघटनेच्या धर्तीवर गोव्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील क्रिकेटपटूंचे लसीकरण करण्याबाबत जीसीए नियोजन आखत आहे. त्यादृष्टीने खासगी इस्पितळाशी करार केला जाईल. लवकरच ही मोहीम सफल ठरविण्याचे लक्ष्य आहे, असे विपुल यांनी नमूद केले. आगामी मोसमाच्या अनुषंगाने क्रिकेटपटूंचे लसीकरण झाल्यास खेळाडूंचे मोसमपूर्व तंदुरुस्ती शिबिर सुरू करणे शक्य होईल, असे विपुल यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर जास्त भर देण्याचे जीसीएने ठरविले आहे. त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक आणण्याचे जीसीएने ठरविले आहे.

ग्लॅन मार्टिन्सचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण 

2020-21मोसमात खेळलेले गोव्याचे क्रिकेटपटू
 सय्यद मुश्ताक अली टी-20स्पर्धा ः 15 खेळाडू 
(निवडलेले खेळाडू 20)
 विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा ः 16 खेळाडू 
(निवडलेले खेळाडू 20)
 सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धा ः13 खेळाडू 
(निवडलेले खेळाडू 21)

गतमोसमात फक्त तीनच स्पर्धा
कोरोना विषाणू महामारीमुळे 2020-21 देशांतर्गत क्रिकेट मोसमात फक्त तीनच स्पर्धा झाल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोसमात सीनियर पातळीवर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा घेतली. सीनियर महिलांत एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन झाले. या सर्व स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात झाल्या होत्या. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या 87 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही प्रतिष्ठेची स्पर्धा होऊ शकली नाही, तसेच बीसीसीआयने वयोगट पातळीवरील सर्व स्पर्धा रद्द केल्या. 2021-22 मोसमात देशांतर्गत पातळीवर सीनियर गटातील स्पर्धा घेण्यास बीसीसीआयचा प्राधान्यक्रम आहे. कोरोना विषाणू महामारीच्या देशातील परिस्थितीनुरूप रणजी करंडक, तसेच अन्य महत्त्वाच्या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. या स्पर्धांसाठी गोवा क्रिकेट संघटनेला संघ तयार करावे लागतील.

गोवा: 18 वर्षांखालील राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सयुरी नाईकची बाजी 

संबंधित बातम्या