पराभवाच्या धक्क्याने गीता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

फोगाट सिस्टरची मामे बहिण रितिकाने सुद्धा कुस्तीमध्ये चांगली कामगिरी करत होती. कुस्तीतील रितिकाचा प्रवास छोटा होता. मात्र राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर तिने आत्महत्या केली.

हरियाणा:फोगाट सिस्टरचं भारतीय महिला कुस्तीमध्ये मोठ नाव आहे. गीता फोगाट आणि बबिता फोगट यांनी स्वतःच्या खेळावर अभिमानास्पद कामगिरी करत भारताचे नाव मोठे केले आहे. या फोगाट सिस्टरची मामे बहिण रितिकाने सुद्धा कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ती पण देशाचा अभिमान वाढवू इच्छित होती आणि त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती.

कुस्तीतील रितिकाचा प्रवास छोटा होता. मात्र राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर तिने आत्महत्या केली. अशी माहिती दिली जात आहे, ही स्पर्धा भरतपूर येथे 12 ते 14 मार्च दरम्यान खेळली गेली होती.

14 मार्च रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यामध्ये रितिकाला एक गुण  कमी मिळाल्याने हा सामना गमवावा लागला. या पराभवानंतर रितिका शॉकमध्ये गेली आणि त्यानंतर तीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

असे म्हटले जात आहे की त्या स्पर्धेत द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारा महावीर फोगटही उपस्थित होता. रितिकाने घरातील पंख्याला स्कार्फ बांधून स्वत: ला गळफास लावून घेतला. मीडिया रिपोर्टनुसार पोस्टमॉर्टमनंतर रितिकाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

संबंधित बातम्या