आमसभेसाठी जीसीएला परवानगी आवश्यक

आमसभेसाठी जीसीएला परवानगी आवश्यक
GCA-Logo

पणजी

कोरोना विषाणू महामारीच्या गोव्यातील परिस्थितीनुरूप आमसभा घेण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) प्रशासनाची परवानगी आवश्यक असून त्यादृष्टीने संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीने गेल्या आठवड्यात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

प्राप्त माहितीनुसारउत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच जीसीएला वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येईल. गोव्यात सध्या कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असून मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आमसभेस परवानगी दिलीतर सामाजिक अंतरतसेच कोविड-१९ संबंधी एसओपी (प्रमाणित कार्यचालन पद्धती) अंमलबजावणी करूनच आससभा घ्यावी लागेल. साऱ्या बाबी तपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीसीएला परवानगी मिळू शकेल. गतवर्षी झालेल्या व्यवस्थापकीय समिती निवडणुकीस जीसीएचे १०७ संलग्न क्लब मतदानात पात्र ठरले होते. संभाव्य आमसभेत हे क्लबतसेच आजीव सदस्यांचा सहभाग असेल.

जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक गतवर्षी २२ सप्टेंबरला झाली होती. त्यावेळी सूरज लोटलीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपाध्यक्ष शांबा नाईक देसाईसचिव विपुल फडकेखजिनदार परेश फडतेसंयुक्त सचिव सय्यद अब्दुल माजीद व सदस्य मोहन चोडणकर निवडून आले होते. जीसीएची ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्ती न्या. लोढा समितीच्या शिफारसींनुसार झाली होती. यंदा जीसीएच्या नव्या व्यवस्थापकीय समितीची पहिलीच आमसभा असेल. आमसभेकडून संघटनेच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळविणे गरजेचे आहे. माहितीनुसारजीसीएचे अंदाजपत्रक पूर्णत्वाकडे आहे.

कोविड-१९ मुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजून देशांतर्गत क्रिकेट मोसम जाहीर केलेला नाही. मैदानावरील क्रिकेट महामारीमुळे पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडू शकते. इतर राज्य संघटनांच्याही आमसभा झालेल्या नाही. संबंधित क्रिकेट प्रशासकीय कारभार सध्या आभासी (व्हर्च्युअल) व्यासपीठाद्वारे सुरू असल्याची माहिती आहे.

 ...तर आमसभा लांबणीवर

राज्यातील कोविड-१९ महामारीची परिस्थिती लक्षात घेताजीसीए आमसभेसाठी घाई करणार नाही असे समजते. आमसभेसाठी क्लब प्रतिनिधी आणि आजीव सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. आमसभेसाठी जीसीएला पूरक जागा शोधावी लागेल. सामाजिक अंतर पाळण्यासाठी पर्वरीतील खुल्या मैदानाचा वापर करण्याचा पर्याय राहीलपण त्यासाठी पावसाळी वातावरणावर अवलंबून राहावे लागेल. कदाचित बिकट परिस्थितीमुळे जीसीएची आमसभा लांबणीवर पडण्याचे सूत्राने नमूद केले.

संपादन- अवित बगळे

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com