चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे लढतच थांबली

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

General चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामनाधिकाऱ्यांनी वर्णद्वेशी टिप्पणी केल्यामुळे इस्तंबूल बॅसाक्‍सेहीर संघाने पीएसजीविरुद्धचा सामना सुरू असताना मैदान सोडले. त्यानंतर लगेचच पीएसजीचा संघही मैदानाबाहेर आल्याने लढत थांबवणे भाग पडले.

पॅरिस :  चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामनाधिकाऱ्यांनी वर्णद्वेशी टिप्पणी केल्यामुळे इस्तंबूल बॅसाक्‍सेहीर संघाने पीएसजीविरुद्धचा सामना सुरू असताना मैदान सोडले. त्यानंतर लगेचच पीएसजीचा संघही मैदानाबाहेर आल्याने लढत थांबवणे भाग पडले. युरोपीय फुटबॉल महासंघाच्या आधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे आता ही लढत आज रात्री उशिरा खेळवण्याचे ठरले आहे. 

रेफरींच्या निर्णयास विरोध करीत असल्याबद्दल इस्तंबूल संघाचे सहाय्यक मार्गदर्शक पिएरो वेबो यांना लाल कार्ड दाखवण्यात आले. यावेळी सामन्याचे नियुक्त चौथ्या क्रमांकाचे आधिकारी सेबॅस्टियन कॉल्तेस्कू यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप तुर्कस्तानमधील या संघाने केला. सामन्याचे मुख्य रेफरी ओविदीऊ हातेगान यांच्याबरोबर दहा मिनिटे चर्चा केल्यानंतर दोन्ही संघांनी मैदान सोडले.

इस्तंबूल संघांनी चौथ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यानंतर सर्व २२ खेळाडूंनी मैदान सोडले. दहा मिनिटाच्या चर्चेनंतर रेफरींनी दोन्ही संघांना चेंजिंग रूममध्ये जाण्याची सूचना केली, असे पीएसजीने सांगितले; तर यूएफाने काही वेळातच सामना स्थगित करण्यात आला आहे. तेरा मिनिटांची लढत झाली होती. आता उर्वरित लढत बुधवारी याच मैदानावर होईल, असे सांगितले.

चौथ्या क्रमांकाचे अधिकारी सेबॅस्टियन कॉल्तेस्कू यांनी एकाकडे बोट दाखवून काळा असे संबोधले आणि त्याला तो दुसरा काळा कोण आहे, हे सांगण्याची सूचना केली, असे दूरचित्रवाणी प्रक्षेपणात दिसले. इस्तंबूल संघाचा बदली खेळाडू देम्बा बा याने रेफरींना ते निग्रो असे का म्हणाले, अशी सातत्याने विचारणा केली. पीएसजीचा बचावपटू किम्पेम्बे याने आम्ही मैदान सोडून जात असल्याचे सांगितले.

 

"जेव्हा एखाद्या गोऱ्या व्यक्तीकडे पाहून बोलतो, त्या वेळी फक्त त्यांना हा माणूस संबोधता; मात्र जेव्हा एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीबाबत बोलायचे असते, त्या वेळी हा काळा माणूस असे का म्हणता?"
- देम्बा बा, कृष्णवर्णीय खेळाडू

यूएफाकडून चौकशी

वर्णद्वेषास फुटबॉलमध्ये स्थान नाही, अशी टिप्पणी युरोपीय महासंघाने केली. त्यानंतर काही वेळातच महासंघ योग्य उपाय योजेल अशी अपेक्षा तुर्कीचे अध्यक्ष तायिप एर्डोगान यांनी केली. इस्तंबूल तसेच पीएसजी संघाने वर्णद्वेशास विरोध असे लिहिलेला फलक ट्‌वीट करीत दबाव वाढवला.

 

अधिक वाचा :

मुंबई सिटीचे आयएसएलमधील अग्रस्थान भक्कम ; चुरशीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीवर मात

 

संबंधित बातम्या