बंगळूरचा पराभव करुन हैदराबाद शर्यतीत कायम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

वृद्धिमन साहाची पुन्हा एकदा मौल्यवान खेळी आणि दडपण आलेले असताना जेसन होल्डरने केलेले टोलेबाजी यामुळे हैदराबादने बंगळूर संघाचा पाच विकेटने पराभव केला आणि आणि आयपीएलमधील प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.

शारजा :  वृद्धिमन साहाची पुन्हा एकदा मौल्यवान खेळी आणि दडपण आलेले असताना जेसन होल्डरने केलेले टोलेबाजी यामुळे हैदराबादने बंगळूर संघाचा पाच विकेटने पराभव केला आणि आणि आयपीएलमधील प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.

गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणाऱ्या हैदराबाजला १२० धावांतच रोखले या धावा करताना वॉर्नर, विल्यमसन असे अनुभवी फलंदाज गमावले असतानाही वृद्धिमन साहाने ३९ धावांचे योगदान दिले. साहा बाद झाल्यावर दडण आले होते, परंतु होल्डरने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या आणि हैदराबादने हा सामना १४.१ षटकांतच जिंकला.

हैदराबादचा मध्यमगती गोलंदाज संदीप शर्माने बंगळूरला सुरुवातीलाच धक्के दिले. त्याने प्रथम देवदत्त पदिक्कलचा त्रिफाळा उडवला त्यानंतर विराट कोहलीचा चकवले. २ बाद २८ नंतर बंगळूरचा डाव अडखळतच राहिला. भरवशाच्या एबी डिव्हिल्यर्सने २४ धावा केल्या, परंतु त्यासाठी त्याने २४ चेंडू घेतले. रशिद खान आणि जेसन होल्डर यांनी डावाच्या मध्यावर अचुक मारा केला त्यामुळे बंगळूच्या मोठ्या धावांच्या आशा मावळल्या होत्या.

वॉशिंग्टन सुंदरने २१ धावा केल्या त्यामुळे बंगळूरला जेमतेम १२० धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक ः बंगळूरः २० षटकांत ७ बाद १२० (जोश फिलिप ३२ -३१ चेंडू, ४ चौकार, विराट कोलली ७, एबी डिव्हिल्यर्स २४ -२४ चेंडू १ चौकार, १ षटकार, संदीप शर्मा २०-२, जेसन होल्डर २७-२,  नटराजन  ११-१ रशिद खान २४-१) पराभूत वि. हैदराबाद ः १४.१ षटकांत ५ बाद १२१ (वृद्धिमन साहा ३९ -३२ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, मनिष पांडे २६ -१९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार जेसन होल्डर नाबाद २६ -१० चेंडू, १ चौकार, ३ षटकार, युझवेंद्र चहल १९-२)

संबंधित बातम्या