Spain vs Germany: स्पेनविरुद्धच्या बरोबरीने जर्मनीचे आव्हान जिवंत, आता 'करो वा मरो'ची लढाई

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत ग्रुप इ मधी स्पेन आणि जर्मनी सामन्यात 1-1 अशा गोलफरकाने बरोबरी झाली.
Niclas Fuellkrug
Niclas FuellkrugDainik Gomantak

Spain vs Germany: रविवारी रात्री उशीरा फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत स्पेन विरुद्ध जर्मनी यांच्यात ग्रुप इ मधील सामना झाला. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 1-1 अशा बरोबरी झाली. त्यामुळे महत्त्वाचा एक गुण मिळाल्याने आता जर्मनीच्या अंतिम 16 संघांमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. स्पेनने मात्र ग्रुप इ मधील अव्वल स्थान चार गुणांसह कायम राखले आहे.

Niclas Fuellkrug
FIFA World Cup 2022: बेल्जियमच्या धक्कादायक पराभवानंतर उसळल्या दंगली; जमावाकडून तोडफोड अन् जाळपोळ

दरम्यान, सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पण दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ गोलसाठी कसोशीने स्पर्धा करताना दिसले. स्पेनकडून (Spain) अल्वारो मोराटा याने 62 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. यामुळे जर्मनीच्या (Germany) स्पर्धेत पुढे जाण्याच्या अपेक्षा धोक्यात आल्या होत्या.

पण, स्पेनला ही आघाडी फारकाळ टिकवता आली नाही. सबस्टिट्यूच म्हणून आलेल्या निक्लस फुलक्रुगने सामन्याचा निर्धारित वेळ संपण्यात सात मिनिटे बाकी असताना म्हणजेच 83 व्या मिनिटाला गोल करत जर्मनीला बरोबरी साधून दिली. इतकेच नाही, तर त्याच्या गोलने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हानही टिकून राहिले.

त्याच्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. याच सामन्यात सर्वात आधी पहिल्या हाफमध्ये जर्मनीला आघाडी घेण्याची संधी होती. 39 व्या मिनिटाला अँटोनियो रुडिगरने जर्मनीसाठी गोल केला होता, पण हा गोल ऑफसाईड असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जर्मनीसाठी हा गोल नाकारण्यात आला.

दरम्यान, हा सामना बरोबरीत सुटल्यानंतरही स्पेनसाठी फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत (FIFA World Cup 2022) अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग कठीण राहिलेला नाही.

स्पेनने त्यांच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात जपानविरुद्ध बरोबरी जरी साधली तरी ते बाद फेरीत प्रवेश मिळवतील. मात्र, आता इ ग्रुमधील जपान, कोस्टारिका आणि जर्मनी यांच्यात मात्र बाद फेरीसाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. जर्मनीचा अखेरचा साखळी सामना कोस्टारिका विरुद्ध होणार आहे.

पण त्याचबरोबर जर स्पेनला जपानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला, तर मात्र या ग्रुपमधील बाद फेरीतील प्रवेशासाठीची समीकरणे आणखीन किचकट होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com