गेट वेल सून 'दादा'..विराट कोहलीसह अनेकांनी दिली प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, विराट कोहली,आयसीसी यांच्यासह अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून सौरव गांगुली लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

कोलकाता :   भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तानंतर क्रिकेट प्रेमींसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, विराट कोहली,आयसीसी यांच्यासह अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी धक्का देणारी आहे. ते आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या