जीएफएने अव्हेरला एफसी गोवाचा प्रस्ताव

किशोर पेटकर
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

प्रो-लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यासंबंधी जीएफएला गेल्या आठवड्यात एफसी गोवाने प्रस्ताव सादर केला होता.

पणजी

गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) तीन मोसमासाठी प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेकरीता नवा पुरस्कर्ता मिळविला आहे. एकॉर्ड स्पोर्टस यांना करार मिळाला असून एफसी गोवा संघाने सादर केलेला प्रस्ताव अव्हेरला गेला. बाहेरगावच्या संघाच्या समावेशाची सूचना संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या पचनी पडली नसल्याचे स्पष्टच आहे.

जीएफएला प्रो-लीग स्पर्धेसाठी आता दीर्घकाळानंतर पुरस्कर्ता मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार२०१४-१५ नंतर स्पर्धा पुरस्कर्त्यांविनाच होती. कोरोना विषाणू महामारीमुळे गोव्यातील परिस्थितीचे अवलोकन करूनच जीएफए २०२०-२१ मोसमाची घोषणा करण्याचे संकेत आहेत. साधारणतः नोव्हेंबरपासून प्रो-लीग स्पर्धेस सुरवात होऊ शकतेत्यापूर्वी त्यांना २०१९-२० मोसमाबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल. कोविड-१९मुळे गतमोसम अर्धवट राहिला आहे.

प्रो-लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यासंबंधी जीएफएला गेल्या आठवड्यात एफसी गोवाने प्रस्ताव सादर केला होता. प्रतिवर्षी १५ ते २० लाख रुपये रकमेचा हा करार होतापण गोवा प्रो-लीग स्पर्धेत बाहेरगावच्या तीन किंवा जास्त संघांना खेळविण्याचा त्यांचा आग्रह होता. आयएसएलतसेच आय-लीग क्लब आपला राखीव संघ गोव्यातील स्पर्धेत खेळविण्यास तयार असल्याचे एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी म्हटले होते. शिवाय बाहेरगावच्या संघाकडून प्रवेश शुल्क आकारण्याची अटही प्रस्तावात होती. मात्र गोव्यातील प्रमुख स्पर्धेत बाहेरगावचे संघ खेळविण्याची कल्पना जीएफए व्यवस्थापकीय समितीला अजिबात मान्य नव्हती आणि त्यामुळे पुरस्कर्त्यांच्या यादीतून एफसी गोवाचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव बाहेर गेलाअसे सूत्राने सांगितले.

जीएफएने एकॉर्ड स्पोर्टस यांनी संघटनेशी तीन मोसमासाठी केलेला करार एकूण ९५ लाख रुपयांचा असून त्याची तीन मोसमात विभागणी होईल. या करारांतर्गत प्रो-लीग स्पर्धेसाठी २०२०-२१ मोसमासाठी २५ लाख रुपये२०२१-२२ मोसमासाठी ३० लाख रुपयेतर २०२२-२३ मोसमासाठी ४० लाख रुपयांचा समावेश आहे. या करारांतर्गत प्रो-लीग स्पर्धाविषयक टीव्हीउपग्रहकेबलडिजिटल प्रक्षेपणमाहिती फलकव्यापारीकरणचाहता समूह आदींचा समावेश असेल. त्यामुळे प्रो-लीग स्पर्धेचे व्यावसायिकीकरण करणे सोपे होईल.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या