जीएफडीसीच्या कारभारात पारदर्शकता असेल : ब्रह्मानंद

जीएफडीसीच्या कारभारात पारदर्शकता असेल : ब्रह्मानंद
brahmanand shankhawalkar

पणजी

गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या (जीएफडीसी) कारभारात पारदर्शकता असेलतेच आपले ध्येय राहीलअसे मत मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या माजी कर्णधाराच्या नियुक्तीवर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले.

कोरोना विषाणू महामारी फुटबॉलवर मर्यादा असल्यातरी ब्रह्मानंद सकारात्मक आहेत. महामारीनंतर फुटबॉल आणखीनच मजबूत होईलअसे त्यांना वाटते. जीएफडीसीच्या माध्यमातून ग्रासरूट फुटबॉल आणि प्रशिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केली. लवकरच मुलं फुटबॉलचा आनंद लुटतील अशी  आश्वासक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१२ साली जीएफडीसीची स्थापना केली होती. त्याच वर्षी त्यांनी फुटबॉल हा राज्य खेळ असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून नोव्हेंबर २०१८ पर्यंत डॉ. रुफिन मोंतेरो मंडळाचे अध्यक्ष होते. डॉ. मोंतेरो यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारने जीएफडीसीचे पुनर्रचना केली आहे. ३१ जुलै २०२० तारखेने राज्य सरकारने जीएफडीसीच्या नव्या सर्वसाधारण सभेचे आणि मंडळ समितीची नियुक्ती केली आहे. नव्या समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी आहे.

आलेक्स दा कॉस्ता यांना जीएफडीसीच्या सदस्य सचिवपदी कायम राखण्यात आले आहे. नव्या उमेदीने नव्या मंडळासह काम करण्यास आपण उत्सुक आहे. फुटबॉलला नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट्य राहीलअसे दा कॉस्ता यांनी नमूद केले. जीएफडीसीच्या मंडळ समिती अकरा सदस्यीय आहे. ब्रह्मानंद अध्यक्षपदीआलेक्स दास कॉस्ता सदस्य सचिवपदीतर डॉ. श्रीकांत आजगावकर उपाध्यक्ष आहेत. आवेर्तान फुर्तादोब्रुनो कुतिन्होज्योवितो लोपिसलव्हिनो रिबेलोलेक्टर मस्कारेन्हासशांताराम नाईकसंजीव नागवेकर व प्रदीप चोडणकर हे सदस्य आहेत. मंडळ समितीवर अध्यक्ष कमाल पाच सदस्यांना निमंत्रित किंवा स्वीकृत नियुक्ती करू शकतील.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com