जीएफडीसी समिती अधिसूचनेविना

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

मंडळाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याची माहिती

पणजी

 गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या (जीएफडीसी) नव्या समितीबाबत संभ्रम आहे. राज्य सरकारने अजून समिती अधिसूचित केलेली नाही, असे जीएफडीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले. 

क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे आदेशान्वये नवी समिती गठित करण्यात आल्याची माहिती आहे, त्यानुसार  गोव्याचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते फुटबॉल गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर जीएफडीसीचे नवे अध्यक्ष आहेत, मात्र ही नवी समिती अधिकृत नसल्याचा दावा जीएफडीसीच्या अधिकाऱ्याने केला आहे. डॉ. रुफिन मोंतेरो यांच्या राजीनाम्यानंतर जीएफडीसीचे अध्यक्षपद सध्या रिक्त असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. गोवा सरकारने जीएफडीसीची नवी समिती अधिसूचित केलेली नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. राज्यातील ग्रासरूट फुटबॉलच्या विकासासाठी जीएफडीसीची २०१२ मध्ये स्थापना झाली होती.  

 

संबंधित बातम्या