जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जीनो, धेंपो क्लबला आघाडी

GCA Premier League : अमोघ, शिवम, स्नेहल, कीननची शानदार शतके
जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जीनो, धेंपो क्लबला आघाडी
GCA Premier League Latest NewsDainik Gomantak

पणजी : जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अमोघ देसाईचे नाबाद दीडशतक, तसेच त्याने शतकवीर शिवम आमोणकर याच्यासह केलेली अडीचशे धावांची भागीदारी यामुळे जीनो स्पोर्टस क्लबने एक पाऊल अंतिम फेरीत टाकले. त्यांनी साळगावकर क्लबवर 181 धावांची आघाडी मिळविली.

GCA Premier League Latest News
पंजाबने राजस्थानला दिले 190 धावांचे लक्ष्य; सामन्यात जितेशची शानदार खेळी

स्नेहल कवठणकर आणि कीनन वाझ यांनी पाचव्या विकेटसाठी 215 धावांची भागीदारी करताना वैयक्तिक शतके ठोकली. त्यामुळे धेंपो क्रिकेट क्लबला करिमाबाद क्रिकेट क्लबविरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर 20 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेता आली. कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर दिवसाचा खेळ थांबला तेव्हा धेंपो क्लबने 8 बाद 385 धावा केल्या होत्या.

स्नेहलने 179 चेंडूंत 15 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 119 धावा केल्या, तर कीननने 160 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. धेंपो क्लबला आघाडीसाठी 62 धावांची गरज असताना बलप्रीत छड्डा याने स्नेहलला बाद करून जमलेली जोडी फोडली, नंतर कीनन वाझही बाद झाला, मात्र विकास सिंगने (36) धेंपो क्लबला आघाडी मिळवून देणारी खेळी केली.

अमोघ, शिवमची प्रेक्षणीय फलंदाजी

सांगे येथील जीसीए मैदानावर अमोघ देसाई व शिवम आमोणकरने प्रेक्षणीय फलंदाजी केली. शिवमने आर्यनसह 76 धावांची सलामी दिल्यानंतर अमोघसह साळगावकर क्लबच्या गोलंदाजांना सतावले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 250 धावांची भागीदारी केली. पार्ट टाईम गोलंदाज वैभव नाईकने शिवमला बाद करून जोडी फोडली. शिवमने 298 चेंडूंतील खेळीत 16 चौकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. अमोघ दिवसअखेर 158 धावांवर नाबाद राहिला. त्याने 267 चेंडूंतील खेळीत 20 चौकार व दोन षटकार मारले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जीनो क्लबने 3 बाद 336 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव : 365 विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव (1 बाद 24 वरून) : 96.1 षटकांत 8 बाद 385 (करण वशोदिया 55, स्नेहल कवठणकर 119, कीनन वाझ 122, योगेश कवठणकर 14, विकास सिंग 36, लकमेश पावणे 2-87, दीपराज गावकर 1-55, बलप्रीत छड्डा 3-67).

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 155 विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिल डाव (बिनबाद 60 वरून) : 112 षटकांत 3 बाद 336 (आर्यन 35, शिवम आमोणकर 119, अमोघ देसाई नाबाद 158, किथ पिंटो 1-108, यश पोरोब 1-29, वैभव नाईक 1-5).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.