GCA Premier League: 'लयभारी जीनो’; चौगुले क्लबवर सनसनाटी विजय

जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट (Cricket) सामन्यात चौगुले स्पोर्टस क्लबवर (Chowgule Sports Club) पाच विकेट्स राखून सनसनाटी विजय नोंदविला.
Shivam Amonkar
Shivam AmonkarDainik Gomantak

पणजी: जीनो स्पोर्टस क्लबने (Gino Sports Club) शुक्रवारी कमाल केली. शतक एका धावेने हुकलेला शिवम आमोणकर (Shivam Amonkar), तसेच अर्धशतके केलेले समर दुभाषी व गौरीश कांबळी यांच्या जोमदार फलंदाजीच्या बळावर तीनशे धावांचे आव्हान जीनो क्लबने पेलले. पहिल्या डावातील शतकी पिछाडीनंतरही त्यांनी जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट (Cricket) सामन्यात चौगुले स्पोर्टस क्लबवर (Chowgule Sports Club) पाच विकेट्स राखून सनसनाटी विजय नोंदविला. सामना कांपाल येथील पणजी (Panaji) जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. (Gino Sports Club defeats Chowgule Sports Club in GCA Premier Cricket League)

सांगे येथील जीसीए मैदानावर करिमाबाद क्रिकेट क्लबने गतविजेत्या मडगाव क्रिकेट क्लबवर (MCC) निर्विवाद वर्चस्व राखताना डाव व ४५ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. कालच्या २ बाद १२५ वरून एमसीसीचा दुसरा डाव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २९२ धावांत संपुष्टात आला. मंथन खुटकरचे शतक ११ धावांनी हुकले. त्याने दिगेश रायकर (४३) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. नंतर अर्धशतक केलेल्या सायेश कामत (५२) व शिवेंद्र भुजबळ (४७) यांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली, पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. करिमाबादचा फिरकी गोलंदाज वेदांत नाईकने ४ गडी बाद केले.

Shivam Amonkar
GCA चे सांगे येथे कोचिंग सेंटर सुरू | Gomantak Tv

जीनोचे अफलातून पुनरागमन

चौगुले क्लबने पहिल्या डावात जीनो क्लबवर १११ धावांची आघाडी घेतली होती. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जीनोला विजयासाठी ३०० धावांचे आव्हान मिळाले. त्यानंतर दिवसअखेर १ बाद ४४ धावा केलेल्या जीनो संघाने शुक्रवारी अफलातून पुनरागमन साधले. सलामीच्या शिवम आमोणकरने जबरदस्त ताकदीने किल्ला लढविला. त्याने आर्यनसमेवत दुसऱ्या विकेटसाठी ५२, तर अतुल यादवसह तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज शदाब खानने शिवमला यष्टिरक्षक पियुष यादवकरवी झेलबाद केले, त्यामुळे त्याचे शतक एका धावेने हुकले. त्याने २१० चेंडूंतील महत्त्वपूर्ण खेळीत १३ चौकार मारले. नंतर समर दुभाषी (नाबाद ५४, ६६ चेंडू, ४ चौकार) व गौरीश कांबळी (५६, ५७ चेंडू, ७ चौकार, २ षटकार) यांनी प्रतिस्पर्ध्यांवर प्रतिहल्ला चढविला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. विजयासाठी १६ धावा हव्या असताना गौरीश बाद झाला, पण तोपर्यंत जीनो क्लबचा विजय पक्का झाला होता.

Shivam Amonkar
Football Premier League वर कोरोनाचे सावट

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २२६ व दुसरा डाव: १८८ पराभूत वि. जीनो स्पोर्टस क्लब ः ११५ व दुसरा डाव ः ८५.४ षटकांत ५ बाद ३०३ (शिवम आमोणकर ९९, आर्यन २०, अतुल यादव ३८, समर दुभाषी नाबाद ५४, गौरीश कांबळी ५६, फेलिक्स आलेमाव १-७३, दर्शन मिसाळ २-८८, शदाब खान २-६७).

मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव: १२९ व दुसरा डाव ः ८६.४ षटकांत सर्वबाद २९२ (मंथन खुटकर ८९, दिगेश रायकर ४३, शिवेंद्र भुजबळ ४७, सायेश कामत ५२, वेदांत नाईक ४-७४, अझान थोटा १-२८, बलप्रीत छड्डा २-४७, दीपराज गावकर २-६४, सनत म्हापणे १-८) पराभूत वि. करिमाबाद क्रिकेट क्लब ः ९ बाद ४६६ घोषित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com