IPL वाली लव्हस्टोरी; तरुणीने गुडघ्यावर बसून केले प्रपोज

जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू होता, त्यावेळी मैदानावर असे काही घडले की ज्याकडे संपूर्ण जगाने लक्ष वेधले. तिथे एका मुलीने तिच्या प्रियकराला प्रपोज केले.
IPL वाली लव्हस्टोरी; तरुणीने गुडघ्यावर बसून केले प्रपोज
IPL 2022Dainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात काल सामना झाला. जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू होता, त्यावेळी मैदानावर असे काही घडले की ज्याकडे संपूर्ण जगाने लक्ष वेधले. तिथे एका मुलीने तिच्या प्रियकराला प्रपोज केले. (girl from IPL sat on her knees and proposed to her boyfriend)

IPL 2022
महेला जयवर्धनेच्या ड्रीम टीममध्ये एक भारतीय तर दोन पाकिस्तानी

चेन्नई सुपर किंग्जच्या डावाचे 11 वी ओव्हर सुरू होते, त्यावेळी टीव्हीच्या पडद्यावर ही जोडी दाखवली गेली. येथे एक मुलगी गुडघ्यावर बसली आणि तिने प्रियकराला प्रपोज केले. मुलाने प्रस्तावाला होकार दिल्या नंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.

मुलाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची जर्सी घातली होती आणि मुलीनेही लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. दोघांनाही प्रपोज केल्यानंतर मैदानावर मोठा आवाज झाला आणि टाळ्यांचा आवाज घूमू लागला. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

IPL 2022
एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सला धक्का

तुम्हाला सांगतो की, आयपीएल सामन्यात मैदानावर असा प्रस्ताव येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. केवळ प्रेक्षकच नाही तर खेळाडूंनीही अशे प्रस्ताव ठेवले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू दीपक चहरने गेल्या वर्षी मैदानावरच सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले. आयपीएल संपल्यानंतरच दोघांची एंगेजमेंट झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.