मुलींची विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

2020 मध्ये या स्पर्धा भारतात होणार होत्या परंतु कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. फिफाने भारताला याची भरपाई म्हणून 2022 च्या स्पर्धेचे यजमान पद मिळले आहे.

झ्युरिच : फिफाने (Fifa) भारतात होणाऱ्या 17 वर्षाखालील मुलींच्या  विश्वकरंडक फुटबॉल (Football World Cup) स्पर्धेची अधिकृत रित्या घोषणा केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 ला 11 ते 30 ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार आहे. 

ISL Football League: गोव्याचा ग्लॅन मार्टिन्स प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात

2020 मध्ये या स्पर्धा भारतात होणार होत्या परंतु कोरोनाच्या (Covid-19) संकटामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. फिफाने भारताला याची भरपाई म्हणून 2022 च्या स्पर्धेचे यजमान पद मिळले आहे. तर 2023 च्या स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 20 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत होतील. महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्ले-ऑफचे (Playoff) सामने 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येतील. 2022 मध्ये होणाऱ्या 20 वर्षाखालील मुलींच्या विश्वकरंडक स्पर्धा  10 ते 28 ऑगस्ट दरम्यान कोस्टारिकाला होणार आहे. फिफा अरब करंडक स्पर्धेसाठी 14 संघांची प्ले-ऑफ स्पर्धा या वर्षी 19 ते 25 जून दरम्यान होणार आहे. 

संबंधित बातम्या