ग्लॅन मार्टिन्सचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला गोमंतकीय मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स(Glan Martins) याने गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.

पणजी: कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला गोमंतकीय मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स(Glan Martins) याने गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. भारत व कतार यांच्यातील विश्वकरंडक 2022, आशिया करंडक 2023 पात्रता लढतीत प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stemac) यांनी मार्टिन्सला सुरवातीच्या संघात स्थान दिले. (Glenn Martins debut in international football)

कतारमधील दोहा (Doha)येथील जास्सिम बिन हम्माद स्टेडियमवर  (Jassim Bin Hammad Stadium) मार्टिन्सला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी लाभली. अकरा सदस्यीय संघात निवड झालेला तो निवडलेल्या पाच गोमंतकीय खेळाडूंपैकी एकमेव ठरला. आदिल खान, ब्रँडन फर्नांडिस व लिस्टन कुलासो यांना राखीव फळीत ठेवण्यात आले, तर दुखापतीमुळे रॉवलिन बोर्जिस खेळू शकला नाही. कोरोना विषाणू महामारीमुळे ई गटातील बाकी सामने दोहा येथे खेळले जात आहेत. विश्वकरंडक पात्रता फेरीतील भारताचे आव्हान आटोपले आहे, तर आशिया करंडक पात्रतेची संधी आहे.

AFC Champions League: सेवियरच्या उपयुक्ततेस एफसी गोवाचे प्राधान्य

वेळसाव येथील 26 वर्षीय ग्लॅनने 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेत एटीके मोहन बागानतर्फे पदार्पण केले. कोलकात्यातील संघातर्फे सात सामने खेळल्यानंतर तो एफसी गोवा संघात दाखल झाला. त्वरीत प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांचा विश्वास संपादन करत सातत्याच्या जोरावर संघातील जागा पक्की केली. या क्लबतर्फे आठ आयएसएल सामन्यात त्याने एक गोल व एक असिस्ट नोंदविले होता. त्याने एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय संघात त्याची प्रथमच निवड झाली आहे. आय-लीग स्पर्धेत तो स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि चर्चिल ब्रदर्स संघातर्फे खेळला आहे.

संबंधित बातम्या