गोवा: निवृत्तीनंतर स्वप्नीलची बॅट पुन्हा कडाडली

Goa After retirement Swapnils bat tightened again
Goa After retirement Swapnils bat tightened again

पणजी: आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा पहिला मोसम स्फोटक फलंदाजीने गाजविलेला गोव्याचा यशस्वी रणजी क्रिकेट फलंदाज स्वप्नील अस्नोडकरची बॅट निवृत्तीनंतर पुन्हा कडाडली. टी-20 क्रिकेट सामन्यात त्याने पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर शनिवारी 17 चौकार व तीन षटकारांची आतषबाजी करताना 117 धावा केल्या.

मडगाव येथील युवा द गोवा संस्थेची मनोहर पर्रीकर टी-20 क्रिकेट स्पर्धा पर्वरी येथे सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या लढतीत स्वप्नीलच्या पर्वरी वॉरियर्सने ड्युक्स क्रिकेटर्सवर 94 धावांनी सहज मात केली. स्वप्नीलने दोन वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेतून निवृत्त झाल्यानंतर स्वप्नीलने गोव्याच्या 23 वर्षांखालील संघाने प्रशिक्षकपद सांभाळले, त्यानंतर प्रथमच हा 37 वर्षीय फलंदाज स्थानिक स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याची बॅट तळपली. अन्य एका सामन्यात माजी रणजी फिरकीपटू शेरबहादूर यादव (6-12) याच्या भेदक फिरकीच्या बळावर काणकोणच्या मांडवी परिवार संघाने वाळपईच्या युनियन स्पोर्टस क्लबला 10 विकेट राखून हरविले. (Goa After retirement Swapnils bat tightened again)

संक्षिप्त धावफलक :

युनियन स्पोर्टस क्लब : 16.5 षटकांत सर्व बाद 78 (प्रथम कोसांबा 28, पांडुरंग गावकर 12, संकेत पालकर 10, शेरबहादूर यादव 6-12, दीपराज गावकर 2-3, आविष्कार मोने 1-13) पराभूत वि. मांडवी परिवार ः बिन बाद 79 (दीपराज गावकर नाबाद 49, स्नेहल कवठणकर नाबाद 24), सामनावीर  शेरबहादूर यादव.

पर्वरी वॉरियर्स : 20 षटकांत 5 बाद 200 (स्वप्नील अस्नोडकर 117, राजशेखर हरिका 21, रूपेश सर्वणकर 17, सचिन फळदेसाई 13, रविराज तिळवे 3-21, रोहन शेट्टी 1-21, प्रणय कवळेकर 1-12, महेश घाडी 1-25) वि. वि. ड्युक्स क्रिकेटर्स ः 18 षटकांत सर्व बाद 106 (दीपेश म्हालदार 29, मिलिंद चोडणकर 20, कृष्णा शेट्ये 12, सुहर्ष नाईक 10, निकेश पणजीकर 3-3, मनीष काकोडे 2-19, ऋत्विक नाईक 1-17, फरदीन खान 1-16, रीगन पिंटो 1-26), सामनावीर ः स्वप्नील अस्नोडकर.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com