बुद्धिबळ स्पर्धेत अस्मिता अव्वल स्थानी

प्रत्यक्ष बोर्डवर झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 39 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला.स्पर्धेत विजेतेपदासाठी अस्मिता व अनिरुद्ध पार्सेकर यांच्यात चुरस राहिली.
बुद्धिबळ स्पर्धेत अस्मिता अव्वल स्थानी
वास्को: मुरगाव तालुका बुद्धिबळ स्पर्धेतील बक्षीसप्राप्त स्पर्धकांसमवेत मान्यवर.Dainik Gomantak

पणजी: मुरगाव तालुका खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत (chess Competition) अस्मिता (Asmita) रे हिने विजेतेपद मिळविले. स्पर्धा वास्को येथील टिळक मैदान संकुलात झाली. प्रत्यक्ष बोर्डवर झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 39 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला.स्पर्धेत विजेतेपदासाठी अस्मिता व अनिरुद्ध पार्सेकर यांच्यात चुरस राहिली.

वास्को: मुरगाव तालुका बुद्धिबळ स्पर्धेतील बक्षीसप्राप्त स्पर्धकांसमवेत मान्यवर.
Goa: क्रिकेट संघाच्या शिबिराला होणार सुरुवात

अखेरच्या फेरीपूर्वी अस्मिता व अनिरुद्ध यांच्यातील डाव बरोबरीत राहिला. अखेरच्या डावात अनिरुद्धने अर्विन अल्बुकर्क याला, तर अस्मिताने रोहित गावस याला हरविले. त्यामुळे सहा फेऱ्यानंतर अस्मिता व अनिरुद्धचे समान साडेपाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत अस्मिता अव्वल आणि विजेतेपदाची मानकरी ठरली. अनिरुद्धला उपविजेतेपद, तर उत्कर्ष गणपुले याला तिसरा क्रमांक मिळाला.

वास्को: मुरगाव तालुका बुद्धिबळ स्पर्धेतील बक्षीसप्राप्त स्पर्धकांसमवेत मान्यवर.
T20 World cup: आयसीसीने पहिल्यांदाच 'या' नियमाला दिला ग्रीन सिग्नल!

वालंका फर्नांडिस, रोहित गावस, ऋत्विक रायकर, अर्विन अल्बुकर्क, कीथ अल्बुकर्क, आरुष साळगावकर, अनिकेत एक्का यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला. वयोगटात रिशित गावस, बियान्का अल्बुकर्क (7 वर्षांखालील), ॲरोन डिसोझा, रुपिका रायकर (9 वर्षांखालील), सिध राणे, मैझा सय्यद (11 वर्षांखालील), अत्रेय सातार्डेकर, श्री घोणसेकर (13 वर्षांखालील) यांना बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव मुकुंद कांबळी, खजिनदार पुंडलिक नायक, सदस्य प्रशांत रायकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर स्वप्नील होबळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे दर महिन्यास स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला.

Related Stories

No stories found.