ऑलिंपियाड विजेत्यांचे गोवा संघटनेकडून अभिनंदन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

ऑलिंपियाड सुवर्णपदक ही भारताची बुद्धिबळातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१४ साली नॉर्वे येथे झालेल्या ऑलिंपियाड स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला ब्राँझपदक मिळाले होते.

पणजी: ऑलिंपियाड ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद संपादन केलेल्या भारतीय बुद्धिबळ संघटनेचे गोवा बुद्धिबळ संघटनेने अभिनंदन केले आहे. संकेतस्थळ सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारणास्तव या स्पर्धेत रशियासह भारताला संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

ऑलिंपियाड सुवर्णपदक ही भारताची बुद्धिबळातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१४ साली नॉर्वे येथे झालेल्या ऑलिंपियाड स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला ब्राँझपदक मिळाले होते.

भारताची ऑलिंपियाड सुवर्णपदक कामगिरी ऐतिहासिक असून देशातील बुद्धिबळात नवी पहाट उगवली आहे, असे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल व सचिव किशोर बांदेकर यांनी अभिनंदन संदेशात नमूद केले. आहे. भारतीय संघाची सदस्य गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिचेही त्यांनी खास कौतुक केले. ‘‘या कामगिरीने गोवा आणि भारतात नवा उत्साह निर्माण झाला आहे. भारताला बुद्धिबळ खेळाचे उगमस्थान मानले जाते आणि जागतिक ऑलिंपियाड मायदेशी आणण्यास खूप वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. या सोनेरी कामगिरीमुळे आता सरकारी आणि सामाजिक पातळीवर बुद्धिबळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलेल आणि बुद्धिबळास आता प्राधान्यक्रम मिळेल. यशाचे शिलेदार असलेले आमचे मुख्य खेळाडू आणि प्रशिक्षकांचा भारत सरकारने गौरव करायला हवा,’’ असे बांदेकर यांनी म्हटले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या