गोवा, एटीके-मोहन बागान, बंगळूरची निवड

गोवा, एटीके-मोहन बागान, बंगळूरची निवड
football

पणजी

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आगामी एएफसी क्लब फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार, एफसी गोवा एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे, तर एएफसी कप स्पर्धेत एटीके-मोहन बागान संघ खेळेल. बंगळूर एफसीची एएफसी कप स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी निवड झाली आहे.

आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत विजेता ठरल्यामुळे एफसी गोवा सघाला एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या गट साखळी फेरीसाठी पात्रता मिळाली आहे. हा मान मिळविणारा एफसी गोवा हा पहिला भारतीय संघ आहे.

आयएसएल स्पर्धेतील विजेता एटीके आणि आय-लीग विजेता मोहन बागान हे दोन्ही क्लब आता करारानुसार एकत्र आले आहेत, त्यामुळे बागानच्या आय-लीग विजेतेपदामुळे एटीकेला संयुक्त झेंड्याखाली एएफसी कप स्पर्धेची पात्रता मिळाली आहे.

आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत तिसरा क्रमांक मिळालेला बंगळूर एफसी संघ एएफसी कप स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत खेळेल. साखळी फेरीत एटीके संघ उपविजेता ठरला होता, पण मोहन बागानसोबत विलनीकरण झाल्यामुळे एटीके संघाला एएफसी कप स्पर्धेत खेळायला मिळत आहे, त्यामुळे प्ले-ऑफ फेरीसाठी बंगळूर एफसीची निवड झाल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे.

एएफसी क्लब फुटबॉल स्पर्धा २०२१ साली खेळल्या जातील.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com