गोवा बॅडमिंटन संघटना बिनविरोध

किशोर पेटकर
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

अध्यक्षपदासाठी ठाकूरसचिवपदासाठी हेबळेतर खजिनदारपदासाठी सर्फराज शेख

पणजी

गोवा बॅडमिंटन संघटनेची २०२०-२४ कालावधीसाठी व्यवस्थापकीय समिती बिनविरोध ठरणार आहे. समितीच्या सर्व पदासाठी निवडणूक टळली असून निवडीवर १६ ऑगस्ट रोजी संघटनेच्या आमसभेत शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदी नरहर ठाकूरसचिवपदी संदीप हेबळे व खजिनदारपदी सर्फराज शेख यांची फेरनियुक्ती असेल.

संघटनेच्या १६ सदस्यीय व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. पणजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोज पाटील निवडणूक अधिकारी असून आज शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे १६ जागांसाठी तेवढेच अर्ज सादर करण्यात आले. त्यामुळे कार्यकारिणीची निवड बिनविरोध असेल.

मावळत्या व्यवस्थापकीय समितीतील १३ सदस्य आणखी एका कालावधीसाठी कार्यकारिणीवर असतील. अध्यक्षपदासाठी नरहर ठाकूरसचिवपदासाठी संदीप हेबळेखजिनदारपदासाठी सर्फराज शेखचार उपाध्यक्षपदांसाठी अनिल पैंगीणकरगौरीश धोंडपीटर तेलिस व संदीप खांडेपारकरसंयुक्त सचिवपदासाठी वामन फळारीतर संयुक्त खजिनदारपदासाठी लुसियान सुवारिस यांचे अर्ज दाखल झाले. सात सदस्यपदासाठी आग्नेल दा कुन्हाडार्विन बार्रेटोदीपक मयेकरनीलेश नायकपराग चौहानसंजय भोबे व वेन फर्नांडिस यांचे अर्ज आहेत.

नव्या व्यवस्थापकीय समितीत दीपक मयेकरसंजय भोबेवेन फर्नांडिस व डार्विन बार्रेटो हे नवे चेहरे असतील. व्यवस्थापकीय समिती पदासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांची १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता छाननी होईल. संघटनेची आमसभा १६ रोजी खांडेपार येथे होईल.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या