गोवा बॅडमिंटनला मिळणार नवी कार्यकारिणी

किशोर पेटकर
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षसचिवखजिनदारउपाध्यक्ष (४)संयुक्त सचिवसंयुक्त खजिनदार व सदस्य (७) या पदांसाठी मतदान होईल.

पणजी 

गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या सध्याच्या व्यवस्थापकीय समितीचा कार्यकाळ संपत असून त्यानिमित्त नवी कार्यकारिणी निवडण्यासाठी येत्या १६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. खांडेपार येथे होणाऱ्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२०-२४ या चार वर्षांच्या कालावधीसाठी नवी समिती निवडण्यात येईल.

गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षसचिवखजिनदारउपाध्यक्ष (४)संयुक्त सचिवसंयुक्त खजिनदार व सदस्य (७) या पदांसाठी मतदान होईल. पणजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोज पाटील यांची निवडणूक अधिकारी म्हणूनतर लक्ष्मण (सोहन) केळेकर यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी संघटनेचे २१ संलग्न सदस्य क्लब पात्र आहेत. हे क्लब आपला अध्यक्ष किंवा सचिव अथवा प्रतिनिधी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधित्व करू शकेलतसेच संघटनेच्या पदासाठी निवडणूक लढवू शकेल.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याद्वारे स्वीकारण्यात येतील. निवडणूक प्रक्रिया सूरळीत आणि पारदर्शक असावी या हेतूने गोवा बॅडमिंटन असोसिएशनने भारतीय बॅडमिंटन संघटनागोवा क्रीडा प्राधिकरण आणि गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या निरीक्षकास वार्षिक सर्वसाधारण सभेस निमंत्रित केले आहे. निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज तसेच निवडणूक नियम पत्रिका गोवा बॅडमिंटन संघटनेच्या पणजीतील कार्यालयात (द्वारा ओएसिस पेट्रोल पंपडॉन बॉस्को हायस्कूलजवळ) उपलब्ध आहेतअसे संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी कळविले आहे.

 नरहर ठाकूर पुन्हा रिंगणात?

नरहर (ताता) ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापकीय समिती सध्या कार्यरत आहे. हल्लीच्या काळात बॅडमिंटनमध्ये गोव्याने राष्ट्रीय पातळीवर चांगलीच प्रगती साधलेली आहे. गोव्याच्या बॅडमिंटनपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली आहेत. बॅडमिंटन प्रशासनातील दीर्घानुभवी ठाकूर यांना अध्यक्षपदासाठी आणखी एक संधी मिळू शकते. मात्र अजून चित्र स्पष्ट नाही. 

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या