Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडकात गोव्याचा मोठा विजय; कसवणकर बंधू चमकले

19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला तिसऱ्याच दिवशी डाव व 169 धावांनी मोठी विजय साकारता आला.
Cooch Behar Trophy
Cooch Behar TrophyDainik Gomantak

पणजी: दुबळ्या अरुणाचल प्रदेशविरुद्ध दीप व यश या कसवणकर बंधूंची कमाल पाहायला मिळाली, त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला तिसऱ्याच दिवशी डाव व 169 धावांनी मोठी विजय साकारता आला.

सामना गुजरातमधील आनंद येथील लालबहादूर शास्त्री मैदानावर झाला. पहिल्या डावात 249 धावांची आघाडी घेतल्यानंतर गोव्याने अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळला. अरुणाचलने पहिल्या डावात 99 धावा केल्या होत्या, नंतर गोव्याने कालच्या 7 बाद 218 धावांवरून रविवारी सकाळी सर्वबाद 348 धावा केल्या.

Cooch Behar Trophy
Firing in Colorado: कोलोरॅडोच्या 'गे क्लब'मध्ये गोळीबार; 5 ठार, 18 जखमी

दीपचे सामन्यात 10 बळी

गोव्याचा कर्णधार दीप कसवणकर याने सामन्यात 10 गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. या ऑफस्पिनरने एकूण 100 धावा मोजल्या. पहिल्या डावात त्याने 46 धावांत 4 गडी बाद केले, नंतर रविवारी 36 धावांत 6 गडी बाद करून गोव्याच्या एकतर्फी वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. याशिवाय दुसऱ्या डावात फरदीन खान व यश कसवणकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. यश याने पहिल्या डावातही 4 विकेट टिपल्या होत्या.

यशचे शानदार शतक

डावखुरा फलंदाज यश कसवणकर याने कालच्या नाबाद 37 धावांवरून पुढे खेळताना रविवारी शानदार शतक नोंदविले. त्यामुळे गोव्याला मोठी आघाडी घेणे शक्य झाले. यश याने 235 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. त्याने रिजुल पाठक (45 धावा, 108 चेंडू, 6 चौकार) याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

Cooch Behar Trophy
Kumar Vishwas: कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी, केजरीवाल यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा

संक्षिप्त धावफलक

अरुणाचल प्रदेश, पहिला डाव: 99 व दुसरा डाव: 40.2 षटकांत सर्वबाद 80 (आकाश माळी 31, अभिमन्यू 14, क्रिशन 19, फरदीन खान 11-4-18-2, दीप कसवणकर 19.2-4-36-6, अभिनंद ठाकूर 2-0-6-0, यश कसवणकर 8-3-18-2 पराभूत

वि. गोवा, पहिला डाव: 112 षटकांत सर्वबाद 348 (यश कसवणकर 101, रिजुल पाठक 45, फरदीन खान नाबाद 16, अभिनंदन ठाकूर 0, आकाश माळी 5-94, टी. मुरी 4-84).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com