Goa Chess: सरस, रोशेल यांना बुद्धिबळ विजेतेपद

Goa Chess: राज्यस्तरीय 8 वर्षांखालील स्पर्धेत रुद्र, दिया यांना उपविजेतेपद
Goa Chess: सरस, रोशेल यांना बुद्धिबळ विजेतेपद
Goa Chess : Saras PowarDainik Gomantak

पणजीः गोवा बुद्धिबळ संघटनेने (Goa Chess Association) ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या राज्यस्तरीय 8 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत (U-8 State Chess Champioship) खुल्या गटात सरस पोवास याने विजेतेपद मिळविले, तर रुद्र नगर्सेकर उपविजेता ठरला. मुलींत रोशेल परेरा विजेती ठरली, तर अव्वल मानांकित दिया सावळ हिला दुसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील दोन्ही गटात पहिले दोन क्रमांक मिळविल्यामुळे सरस, रुद्र, रोशेल व दिया आता राष्ट्रीय 8 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा 10 सप्टेंबरपासून खेळली जाईल.

Goa Chess : Saras Powar
Olympiad Chess: गोव्याच्या भक्तीने भारतीय संघातील स्थान राखले

राज्यस्तरीय स्पर्धेत 27 खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्‍घाटन संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक यांनी केले. सरसने चारही डाव जिंकून अव्वल स्थान राखले. रोशेलनेही चारही डाव जिंकले. तिसऱ्या फेरीत तिने दिया हिला पराभवाचा धक्का दिला. अंतिम क्रमवारी ः खुला गट ः सरस पोवार, रुद्र नगर्सेकर, आरव प्रभुगावकर, आर्यन नाईक, पृथ्विज गावडे, मॅकेयर गोम्स. मुली ः रोशेल परेरा, दिया सावळ, जेन्सिना सिक्वेरा, स्कायला रॉड्रिग्ज, रुपिका रायकर, म्युरियल फर्नांडिस.

Goa Chess : Saras Powar
Goa Chess: एथनची अंतिम फेरीत धडक

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com