Goa: बुद्धिबळपटू अमेय अवदीला राज्यपालांनी केले सन्मानित

गतवर्षी जुलैमध्ये त्याच्या या किताबावर जागतिक बुद्धिबळ (Chess) महासंघाने शिक्कामोर्तब केले आहे.
Goa: बुद्धिबळपटू अमेय अवदीला राज्यपालांनी केले सन्मानित
बुद्धिबळपटू अमेय अवदी सन्मानित करताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सोबत पालकDainik Gomantak

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (IM) बुद्धिबळपटू अमेय अवदी याला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Governor P. S. Sreedharan Pillai) यांनी सन्मानित केले. दोना पावला येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी अमेयच्या कामगिरीचे कौतुक केले.

अमेय हा गोव्यातील पाचवा आयएम बुद्धिबळपटू आहे. गतवर्षी जुलैमध्ये त्याच्या या किताबावर जागतिक बुद्धिबळ महासंघाने शिक्कामोर्तब केले आहे. अमेय 22 वर्षांचा आहे.

बुद्धिबळपटू अमेय अवदी सन्मानित करताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सोबत पालक
आल्मेदा यांच्या विरोधात बोलल्यास...:दीपक नाईक

त्याने नाव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयएम किताबासाठी आवश्यक तीन नॉर्म प्राप्त केले, तसेच 2400 एलो रेटिंगचाही टप्पा गाठला. यावेळी अमेय याचे वडील दत्ता, आई गिरिजा, बंधू साईश अवदी यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.