Goa Cricket: खेळाडूंकडून सातत्य अपेक्षित ः भास्कर

Goa Cricket: संभाव्य संघ पुदुचेरीत खेळणार; अमित, हर्षदचाही समावेश
Goa Cricket: Coach K. Bhaskar Pillai interacting with the players.
Goa Cricket: Coach K. Bhaskar Pillai interacting with the players.Dainik Gomantak

पणजी : क्रिकेट मैदानावर यशस्वी ठरण्यासाठी सातत्याची गरज आहे, प्रशिक्षक या नात्याने आपल्याला गोव्याच्या क्रिकेट खेळाडूंकडून (Goa Cricket Players) हेच अपेक्षित आहे, असे रणजी-सीनियर संघाचे (Ranji-Senior Team) मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई (K. Bhaskar Pillai) यांनी शनिवारी सांगितले.प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्लीचे माजी फलंदाज व अनुभवी प्रशिक्षक भास्कर यांनी संभाव्य संघ खेळाडूंशी संवाद साधला. मोसमपूर्व सरावासाठी गोव्याचा संभाव्य संघ पुदुचेरीस जाणार आहे. तेथे सरावासोबत आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत संघ भाग घेईल. त्यासाठी 26 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ऑफस्पिनर अमित यादव आणि मध्यमगती हर्षद गडेकर या अनुभवी खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. दौऱ्यास 20 ऑगस्टपासून सुरवात होईल. भास्कर रविवारी (ता. 15) दिल्लीस रवाना होतील आणि तेथून थेट पुदुचेरीत संघाशी जोडले जातील, असे गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) स्पष्ट केले. संघात एकनाथ केरकर हा पाहुणा खेळाडू असून आणखी दोघे जणांची निवड होण्याचे संकेत आहेत.

Goa Cricket: Coach K. Bhaskar Pillai interacting with the players.
Goa Cricket: प्रशिक्षकपदाची सूत्रे भास्कर यांनी स्वीकारली

वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची

भास्कर यांनी सांगितले, की ``क्रिकेट हा सांघिक खेळ असला, तरी वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची ठरते. प्रशिक्षक व खेळाडूंतील संवाद गरजेचा असतो. संघातून खेळताना प्रत्येकास आपल्या जबाबदारीचे भान हवे आणि सातत्याने अंमलबजावणी हवी. वैयक्तिक आणि सांघिक लक्ष्य समोर खेळताना सफल ठरण्यासाठी परिपूर्ण सराव निर्णायक ठरतो. प्रत्येक खेळाडूकडून सातत्य, तसेच सर्वांकडून संघभावना अपेक्षित आहे.`` 58 वर्षीय भास्कर 2007 पासून क्रिकेट प्रशिक्षणात आहेत. राजस्थान, त्रिपुरा, दिल्ली, उत्तराखंड या संघांना त्यांनी मार्गदर्शन केले असून सफलताही मिळविली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 95 सामने खेळले असून 52.84च्या सरासरीने 5443 धावा केल्या आहेत. यामध्ये 18 शतकांचाही समावेश आहे. क्षेत्ररक्षणातही छाप पाडताना त्यांनी 100 झेल टिपले आहेत.

Goa Cricket: Coach K. Bhaskar Pillai interacting with the players.
Goa Cricket: पुनरागमनासाठी अमित यादव प्रयत्नशील

पुदुचेरी दौऱ्यासाठी निवडलेले खेळाडू

आदित्य कौशिक, अमोघ देसाई, ईशान गडेकर, निहाल सुर्लकर, सुमीरन आमोणकर, वैभव गोवेकर, स्नेहल कवठणकर, समीत आर्यन मिश्रा, मंथन खुटकर, दीपराज गावकर, विश्वंबर काहलोन, राजशेखर हरिकांत, समर दुभाषी, हेरंब परब, लक्षय गर्ग, ऋत्विक नाईक, फेलिक्स आलेमाव, अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, मलिकसाब शिरूर, एकनाथ केरकर, विजेश प्रभुदेसाई, मोहित रेडकर, सुयश प्रभुदेसाई, अमित यादव, हर्षद गडेकर.

``भास्कर यांनी दिल्लीसारख्या प्रमुख संघासमवेत काम केले आहे. त्यांच्यापाशी सर्वंकष अनुभव आहे. आमच्या संघासाठी त्यांचे व्यवस्थापन कौशल्य खूप लाभदायी ठरू शकते, त्याचा उपयोग संघाला वरच्या गटात जाण्यासाठी होऊ शकतो. त्यांच्यासमवेत जीसीए दीर्घकालीन संबंध ठेवू इच्छित आहे, जेणेकरून आवश्यक कामगिरी आणि यश मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.``

- विपुल फडके,

सचिव - गोवा क्रिकेट असोसिएशन

Goa Cricket: Coach K. Bhaskar Pillai interacting with the players.
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com