मुख्य क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्यासमवेत जीसीएचे सचिव विपुल फडके (उजवीकडे)
मुख्य क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्यासमवेत जीसीएचे सचिव विपुल फडके (उजवीकडे) Dainik Gomantak

पणजी जिमखान्यावर साकारणार क्रिकेट अकादमी

'भाऊसाहेब बांदोडकर क्रिकेट मैदान' 1 नोव्हेंबरपासून होणार पूर्ण क्षमतेने सज्ज

पणजी: कांपाल (Campal, Panaji) येथील पणजी जिमखान्याचे (Panaji Gymkhana) ऐतिहासिक 'भाऊसाहेब बांदोडकर क्रिकेट मैदान' (Bhausaheb Bandodkar Ground) येत्या एक नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने सज्ज होणार आहे. या ठिकाणी गोवा क्रिकेट असोसिएशनची (GCA) दर्जेदार क्रिकेट अकादमी लवकरच कार्यरत होईल, असा विश्वास संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी व्यक्त केला.

मुख्य क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्यासमवेत जीसीएचे सचिव विपुल फडके (उजवीकडे)
वास्कोची 'गार्डियन एंजल' क्लबवर मात

भाऊसाहेब बांदोडकर मैदान नूतनीकरण आणि वापर संदर्भात जीसीए व पणजी जिमखान्यात सांमजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत गेल्या वर्षी जूनपासून मैदान नूतनीकरणाचे काम सुरू झाले. मुख्य मैदानावर पाच क्रिकेट खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन सराव खेळपट्ट्याही सज्ज करण्यात आल्या आहेत. पणजी जिमखान्याच्या वापरासाठीही सराव खेळपट्टी तयार केली जाईल, असे फडके यांनी नमूद केले. या मैदानाचे गतवर्षी काम पूर्ण झाले होते, मात्र सराव खेळपट्ट्या व इतर कामे बाकी होती, ती आता पूर्णत्वाकडे आहेत.

‘‘जीसीएचे मुख्य क्युरेटर सूर्यकांत नाईक, तसेच मैदान कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे बांदोडकर मैदानाचे काम पूर्णत्वास गेले आहे. सध्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. एक नोव्हेंबरपासून मैदान स्पर्धात्मक क्रिकेटसाठी वापरास येईल. पणजी जिमखाना संकुलात लवकरच जीसीए दर्जेदार क्रिकेट अकादमी कार्यान्वित करणार असून जीसीएचे एनसीए प्रमाणपत्रधारक लेव्हल 1, 2 प्रशिक्षक येथे मार्गदर्शन करतील,’’ असे फडके यांनी सांगितले.

मुख्य क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्यासमवेत जीसीएचे सचिव विपुल फडके (उजवीकडे)
संजना ठरली राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 'सुवर्ण पदकाची' मानकरी

क्लबसाठी T-20 स्पर्धा

गोवा क्रिकेट असोसिएशन संलग्न क्लबसाठी T-20 स्पर्धेचे नियोजन करत असून या स्पर्धेतील सामने भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होतील, असे विपुल फडके यांनी सांगितले. लवकरच या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली जाईल. बांदोडकर मैदानावर आगामी महिन्यात वयोगट क्रिकेटपटूंसाठी जीसीए शिबिर घेणार असल्याची माहिती फडके यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com