Goa cricket Association
Goa cricket AssociationDainik Gomantak

Goa Cricket: राज्यातील क्लबना आर्थिक साह्य

Goa Cricket: जीसीएच्या वार्षिक आमसभेत निर्णय, अनुक्रमे एक व तीन लाख रुपये अनुदान

पणजीः गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) खर्च मार्गदर्शक तत्त्वानुसार संलग्न क्लबना आर्थिक साह्य करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यानुसार पात्र संलग्न क्लबना प्रत्येकी एक लाख रुपये, तसेच या वर्षी प्रीमियर लीग झाली, तर या स्पर्धेतील क्लबना प्रत्येकी तीन लाख रुपये अनुदान देण्याचे संघटनेच्या वार्षिक आमसभेत (Annual General Body Meeting) ठरले. कोरोना विषाणू महामारी निर्बंधांमुळे जीसीए वार्षिक आमसभा रविवारी ऑनलाईन झाली. कोविड-19मुळे सलग दुसऱ्या वर्षी वेबिनार पद्धतीने वार्षिक आमसभा घ्यावी लागली. आमसभा कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी तटस्थ छाननी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

Goa cricket Association
Goa Cricket: क्रिकेटपटूंच्या आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध ः लोटलीकर

ऑनलाईन आमसभेनंतर जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले, की महामारीमुळे प्रत्यक्ष आमसभा घेणे शक्य नव्हते, त्यामुळे आम्ही वेबिनारद्वारे आमसभा प्रक्रिया पूर्ण केली. त्यात 75 क्लबनी भाग घेतला. बैठकीत 2020-21 आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली, तसेच 2021-22 आर्थिक वर्षासाठी वैधानिक आणि अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले. त्यास आमसभेत एकमताने मंजूरी दिली. नेलिया व्हेरोष्का कोट्टा दो रेगो यांची वैधानिक लेखापाल, तर चिगार केंकरे अँड कंपनी यांची अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्ती झाली. जीसीए वार्षिक आमसभेत वर्षभरात निधन झालेल्या क्रिकेटमधील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये वाळपईच्या युनियन स्पोर्टस क्लबचे माजी अध्यक्ष अनिल पोकळे, माजी क्रिकेटपटू-पंच दीपक शिरगावकर, माजी कसोटीपटू यशपाल शर्मा, गोव्याचे माजी रणजीपटू प्रसाद आमोणकर व जेरी फर्नांडिस, तसेच महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू रमेश बोर्डे यांच्या स्मरणार्थ एक मिनिट स्तब्धता पाळण्यात आली.

Goa cricket Association
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com