Goa Cricket : गोव्याचे दोन दशकानंतर तमिळनाडूस आव्हान

Goa Cricket : रणजी क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्याविरुद्ध पुढील वर्षी जानेवारीत सामना
Goa Cricket : गोव्याचे दोन दशकानंतर तमिळनाडूस आव्हान
Goa Cricket : Ranji TrophyDainik Gomantak

पणजी : रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट (Cricket) स्पर्धेच्या आगामी मोसमात गोव्याचा (Goa) संघ तब्बल दोन दशकानंतर बलाढ्य तमिळनाडूस (Tamilnadu) आव्हान देणार आहे. नोव्हेंबर 2001 नंतर पुढील वर्षी जानेवारीत माजी विजेत्याविरुद्ध गोवा देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळेल. याव्यरितिक्त रेल्वे संघाविरुद्धही दीर्घ कालावधीनंतर सामना होईल. रणजी करंडक स्पर्धेत गोव्याचा दक्षिण विभागात समावेश होता, तेव्हा 1985-86 ते 2001-2002 या कालावधीत त्यांचे तमिळनाडूविरुद्ध 17 सामने झाले. दक्षिणेकडील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात करणे गोव्याला एकदाही शक्य झाले नाही. या दोन्ही संघांतील अखेरचा रणजी करंडक सामना 24 ते 27 नोव्हेंबर 2001 या कालावधीत चेन्नईत झाला होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी, तळात अवधूत आमोणकर व अविनाश आवारे यांनी दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत खिंड लढविल्यामुळे गोव्याला पराभव टाळता आला. आता येत्या वर्षी 27 ते 30 जानेवारी या कालावधीत अहमदबाद येथे एलिट ड गटात गोवा आणि तमिळनाडू यांच्यातील सामना नियोजित आहे.

Goa Cricket : Ranji Trophy
Goa Sports: रणजी स्पर्धेत गोव्यासाठी कठीण गट

माजी विजेत्या रेल्वेविरुद्धही गोव्याचा संघ 15 वर्षांनंतर रणजी करंडक सामन्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना अहमदाबाद येथेच 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होईल. यापूर्वी रणजी स्पर्धेच्या प्लेट गटात गोवा व रेल्वे यांच्यात 15 ते 18 नोव्हेंबर 2007 या कालावधीत मडगाव येथील डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर सामना झाला होता. तेव्हा लढत अनिर्णित राहिली होती.

2021-22 मोसमातील ‘रणजी’ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गोवा

संघ सामने विजय पराभव अनिर्णित

तमिळनाडू 17 0 12 5

झारखंड 9 2 3 4

जम्मू-काश्मीर 8 2 2 4

सौराष्ट्र 4 1 1 2

रेल्वे 2 0 1 1

Goa Cricket : Ranji Trophy
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com