एकनाथ केरकरची गोवा संघाच्या कर्णधारपदी निवड

गोव्याच्या टी-20 क्रिकेट संघात अमित यादवचे चार वर्षांनंतर पुनरागमन
Goa Captain Eknath Kerkar
Goa Captain Eknath KerkarDainik Gomantak

Goa Cricket: पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने गोव्यातर्फे दुसरा मोसम खेळणारा यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर (Cricketer Eknath Kerkar) याची गोव्याच्या कर्णधारपदी (Goa Captain) अपेक्षित निवड झाली. आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने वीस सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात ऑफस्पिनर अमित यादव याने चार वर्षांनंतर पुनरागमन केले.

Goa Captain Eknath Kerkar
वेदांत महिला लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी वायएफए, शिरवडे संघाला पूर्ण गुण

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी गोव्याचा एलिट ड गटात समावेश आहे. स्पर्धा 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे खेळली जाईल. त्यापूर्वी 27 ऑक्टोबरपासून स्पर्धा केंद्रावर विलगीकरण प्रक्रिया असेल. गोव्याच्या गटात पंजाब, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, पुदुचेरी हे संघ आहेत.

गोवा सीनियर क्रिकेट निवड समितीची बैठक सोमवारी पर्वरी येथील जीसीए संकुलात झाली. त्यात संघटनेचे सचिव विपुल फडके, प्रशिक्षण-क्रिकेट कार्यवाही संचालक प्रकाश मयेकर, निवड समिती अध्यक्ष गिरीश पारेख, सदस्य आनंद म्हापणकर व संजय धुरी यांनी भाग घेतला. यष्टिरक्षक समर दुभाषी यालाही टी-20 संघात स्थान मिळाले आहे.

Goa Captain Eknath Kerkar
जॉय काकोडकरने बुद्धिबळात विजेतेपद पटकावले

अमितचा शेवटचा सामना 2017 साली

अमित 2 फेब्रुवारी 2017 रोजी चेन्नई येथे केरळविरुद्ध गोव्याच्या टी-20 संघातून शेवटचा सामना खेळला होता. 32 वर्षीय अनुभवी अमितने 36 टी-20 सामन्यांत गोव्याचे प्रतिनिधित्व केले असून 32 विकेट मिळविल्या आहेत.

संघात तिघे पाहुणे

कर्णधार एकनाथसह गोव्याच्या संघात तिघे पाहुणे (व्यावसायिक) क्रिकेटपटू आहेत. यामध्ये मुंबईचा शुभम रांजणे व विदर्भाचा श्रीकांत वाघ या अष्टपैलूंचा समावेश असून ते प्रथमच गोव्याचे प्रतिनिधित्व करतील.

गोव्याचा टी-20 संघ

एकनाथ केरकर (कर्णधार), ईशान गडेकर, वैभव गोवेकर, आदित्य कौशिक, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, शुभम रांजणे, मोहित रेडकर, दीपराज गावकर, विश्वंबर काहलोन, दर्शन मिसाळ, अमूल्य पांड्रेकर, अमित यादव, मलिकसाब शिरूर, समर दुभाषी, विजेश प्रभुदेसाई, फेलिक्स आलेमाव, निहाल सुर्लकर, श्रीकांत वाघ, लक्षय गर्ग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com