गोव्याच्या क्रिकेट संघाची दिल्लीकडे कूच

१३ जानेवारीपासून रणजी करंडक (Ranji Trophy) (एलिट ड गट) स्पर्धेत गोवा (Goa) खेळणार असून नियमानुसार प्रत्येक स्पर्धेपूर्वी आठ दिवसीय विलगीकरण बंधनकारक असेल.
गोव्याच्या क्रिकेट संघाची दिल्लीकडे कूच
पुदूचेरीतील नियोजित क्रिकेट (Cricket) स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे आता गोव्याचा (Goa) सीनियर क्रिकेट संघ दिल्लीकडे (Delhi) कूच करणार आहे. Dainik Gomantak

पणजी: पुदूचेरीतील नियोजित क्रिकेट (Cricket) स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे आता गोव्याचा (Goa) सीनियर क्रिकेट संघ दिल्लीकडे (Delhi) कूच करणार आहे. देशाच्या राजधानीत काही प्रमुख रणजी संघांविरुद्ध सामने खेळेल.

पुदूचेरीतील नियोजित क्रिकेट (Cricket) स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे आता गोव्याचा (Goa) सीनियर क्रिकेट संघ दिल्लीकडे (Delhi) कूच करणार आहे.
Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गोव्यातील ऐतिहासिक गणपतीचे' खास दर्शन

दिल्लीतील स्पर्धेतील वेळापत्रक अजून आलेले नाही, एकदोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होईल, पण तेथे स्पर्धा होणार हे निश्चित असल्याने संघ शुक्रवारी दिल्लीस रवाना होईल, असे गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांनी सांगितले. गोव्याचा संभाव्य सीनियर क्रिकेट संघ गतमहिन्यापासून मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली पुदूचेरीत सराव करत होता, तेथे एक स्पर्धाही नियोजित होती. मात्र पाऊस, नंतर कोरोना विषाणू महामारीच्या कारणास्तव तेथील स्पर्धा लांबली. त्याऐवजी आता दिल्लीत स्पर्धा खेळण्याचे ठरले, असे विपुल यांनी स्पष्ट केले.

प्राप्त माहितीनुसार, दिल्लीचा संघ सध्या घरच्या मैदानावर आगामी मोसमासाठी तयारी करत आहे. सेनादल संघाचे मुख्यालयही दिल्लीत आहे. हरियानाही दिल्लीतच सराव करत आहे. गोव्याचा संघही आता राजधानीत जात असल्याने या चार संघात तेथे स्पर्धा खेळविण्याचे दिल्ली क्रिकेट संघटनेने ठरविले आहे. गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ २०२१-२२ मधील देशांतर्गत मोसमात तीन प्रमुख स्पर्धा खेळेल. ४ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० (एलिट अ गट), ८ डिसेंबरपासून विजय हजारे करंडक एकदिवसीय (एलिट ई गट) व १३ जानेवारीपासून रणजी करंडक (एलिट ड गट) स्पर्धेत गोवा खेळणार असून नियमानुसार प्रत्येक स्पर्धेपूर्वी आठ दिवसीय विलगीकरण बंधनकारक असेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com