Goa: क्रिकेट संघाच्या शिबिराला होणार सुरुवात

20 ऑक्टोबरपासून संघाचे स्पर्धा केंद्रावर (Center) विलगीकरण होईल.
Goa: क्रिकेट संघाच्या शिबिराला होणार सुरुवात
Cricket Dainik Gomantak

पणजी: देशांतर्गत क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील सीनियर संघाचा मोसम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. त्यानिमित्त गोवा क्रिकेट असोसिएशनने येत्या आठवडाअखेरपासून सीनियर पुरुष संघाचे सराव शिबिर सुरू करण्याचे निश्चित केल्याची माहिती संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी दिली.

गोव्याचा सीनियर पुरुष संघाने मोसमपूर्व तयारीसाठी अगोदर पुदुचेरी, तर नंतर दिल्लीचा (Delhi)दौरा केला. सध्या संभाव्य संघाला विश्रांती देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 (T-20) क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम चार नोव्हेंबरपासून सुरू होईल. गोव्याचा एलिट अ गटात समावेश असून सामने लखनौ येथे खेळले जातील. स्पर्धेपूर्वी कोविडविषयक विलगीकरण प्रक्रिया लखनौ येथे 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. संघाचे मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई गुरुवारपर्यंत दाखल होणार आहेत.

Cricket
मणेरी-दोडामार्ग येथे 'तिळारी' च्या कालव्याचा फुटला बांध

सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा एलिट D गटात समावेश आहे. या गटातील सामने विशाखापट्टणम (Visakhapatnam)येथे 31 ऑक्टोबरपासून खेळले जातील. त्यापूर्वी 20 ऑक्टोबरपासून संघाचे स्पर्धा केंद्रावर विलगीकरण होईल. ऑस्ट्रेलिया (Australia) दौरा आटोपून शिखा पांडे परतणार असल्यामुळे तिच्याकडेच गोव्याचे नेतृत्व संभव आहे. शिखाच्या समावेशाने गोव्याची ताकदही वाढणार आहे.

दृष्टिक्षेप:

  • सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धा 31 ऑक्टोबरपासून

  • गोव्याच्या एलिट D गटात विदर्भ, हरियाना, मध्य प्रदेश, गुजरात व मिझोराम

  • सीनियर पुरुष सय्यद मुश्ताक अली करंडक टी- 20 स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून

  • गोव्याच्या एलिट A गटात ओडिशा, पुदुचेरी, पंजाब, तमिळनाडू व महाराष्ट्र

Related Stories

No stories found.